रावेर, (प्रतिनिधी) – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे निकटवर्तीय जेष्ठ शिवसैनिक छोटु पाटील (रेंभोटा) यांचे कडुन मास्क वाटप करण्यात आले. युवासेना/शिवसेना यांच्या सौजन्याने निंभोरा-तांदलवाडी जिल्हा परिषद गटात एक हजार मास्क वाटप करण्यात आले.
वाघाडी येथे 250 मास्क देण्यात आले होते ते किराणा दुकानदार ,नागरिक, दुध डेयरी कर्मचारी यांना मास्क चे वाटप युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख भैया पाटील व युवासेना मित्रपरिवारा मार्फत करण्यात आले.