Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

९७ व्या साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरवात ; चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, फुलांच्या वर्षावात स्वागत

najarkaid by najarkaid
February 2, 2024
in जळगाव
0
९७ व्या साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरवात ; चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, फुलांच्या वर्षावात स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 2 फेब्रुवारी, 2024 (प्रतिनिधी): शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

            सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतांच्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तसतसा अमळनेरकरांकडून दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता.

ग्रंथदिंडी सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, सुभाष चौक, स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या मार्गाने येत असताना चौकात विविध ठिकाणी रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दिंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

या संस्थाचा होता सहभाग

केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगाराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, मराठी वाड:मय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, महसुल व पोलीस प्रशासन, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  ग्रंथदिंडी सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us