चाळीसगाव ;- गेल्या ४ वर्षांपासून एका गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने ९ रोजी अटक केली . समाधान गायकवाड रा. तरवाडे पेठ असे आरोपीचे नाव असून तो गेल्या चार वर्षांपासून फरार होता.
समाधान गायकवाड याला पीएसआय सुधाकर लाहरे , हेकॉ नारायण पाटील,रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने,महेश पाटील , अशोक पाटील आदींच्या पथकाने अटक केली . त्याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.