Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न – आमदार किशोरअप्पा पाटीलांची जोरदार पत्रकार परिषद, काय म्हटले पहा

najarkaid live by najarkaid live
August 26, 2022
in जळगाव
0
हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न – आमदार किशोरअप्पा पाटीलांची जोरदार पत्रकार परिषद, काय म्हटले पहा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेवर २०० कोटी रूपयांच्या भुखंडाची फसवणुक करण्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केला असुन हा आरोप तथ्यहिन असुन पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर जनतेची दीशाभुल करण्याचा व आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.याउलट अमोल शिंदे यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.त्यांनी व त्यांच्या नात्यातिल सदस्यांनी सत्तेत असतांना अनेक खुल्या जागांवर आपली मालकी दाखवत आपले व्यवसाय सुरू ठेवले असुन येणार्‍या काळात ह्या सर्व खुल्या जागा मुक्त करण्यासाठी कायदेशिर लढा देणार असुन सुरूवात त्यांनी केली असुन शेवट मी करणार असल्याचा ईशारा आमदार किशोर पाटिल यांनी पञकार परिषद घेउन दिला.

येथिल शिंदे गटातिल आमदार किशोर पाटिल यांनी त्यांच्या निवासस्थानी २०० कोटी रूपायांच्या भुखंड अपहाराच्या आरोपा विरुध्द पञकार परीषद घेण्यात आली.यावेळी आमदार किशोर पाटिल,लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल,मुकुंद बिल्दिकर,रावसाहेब पाटिल,शितल सोमवंशी,राम केसवाणी,सतिष चडे,बंडु चौधरी,सुनिल पाटिल,रहिमान तडवी,किशोर बारावकर यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक आणी पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षित भुखंडाच्या अपहाराचे आरोप हे नगरपालिका सत्ताधारी व प्रशासनावर केले असले तरी नगरपालिकेत माझी सत्ता असल्याने या सर्व प्रकरणाला मी उत्तर देणार असल्याचे आमदार किशोर पाटिल यांनी अगोदर स्पष्ट केले.

या पञकार परिषदेचे प्रास्ताविक करतांना मुकुंद बिल्दिकर यांनी सांगितले की,ज्या भुखंडांवरिल आरक्षण उठवण्याचे काम नगरपिलिकेने ठराव करून केले आहे ती सर्व प्रक्रिया ही कायद्याच्या चौकटित राहुन केली आहे.याअगोदर असे अनेक आरक्षण काढल्या गेली असुन ज्या जमिन मालकांचे आरक्षण काढण्याची प्रक्रिया केली गेली त्यांनीच नगरपालिका प्रशासनाला विनंती अर्ज केले होते.त्यांची परिस्थीही ही हालाकिची असल्याने नगरपालिका प्रशासनाला ही भुमिका घ्यावी लागली असुन ह्या जमिनी कुणाच्या बापाची नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटिल म्हणाले की, आरक्षित असलेल्या शेतजमिनिंवरिल आरक्षण उठवण्याची प्रक्रीया गेल्या अनेक वर्षात झाल्या आहेत.यात नविन असे काही नाही.ज्या कारणांसाठी या जमीनी आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातिल बहुतांशी विकास कामे शहरात झाली आहेत. तर ज्यासाठी शेतजमीन आरक्षित आहे तो प्रकल्प राबवण्यासाठी ती शेतजमीन शेतकर्‍यांकडुन विकत घेण्या इतपत नगरपालिकेची आर्थिक परिस्थीती नसुन शेतजमीनीवर आरक्षण आल्याने या कुटुंबांची आर्थिक स्थीती खुप खालावलेली होती.

मुळ शेतमालकाने नगरपालिकेला दिलेल्या अर्जाप्रमाणे ठराव मंजुर करून त्याबाबतच्या सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करूनच हे आरक्षण उठवण्याचे काम सुरू आहे.या जमीनींची २०० कोटी रूपये किंमत विरोधकांनी काढतांना थोडा विचार करायला हवा होता. शेतजमीन ही शेतमालकाची असुन ती त्याची खाजगी मालमत्ता आहे.यात नगरपालीका प्रशासन व सत्ताधारी यांना कुठलाही सहभाग नाही.फक्त त्या शेतजमीनिवरिल आरक्षण उठवणे म्हणजे अपहार करणे असा त्याचा अर्थ होत नाही.याउलट ज्यांनी आरोप केले त्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड.अभय पाटिल यांच्याबाबत सर्व मतदार संघाला माहीती आहे.सोबतच भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आरोप करतांना आपले व्यवसाय कोणत्या जागांवर कसे सुरू आहेत याचा विचार अगोदर करायला हवा होता. शहरातिल विवेकानंद नगरमधिल शाळा,नवजिवन सुपर शाॅप चे बांधकाम, पाचोरा सेंट्रल माॅलचे बांधकाम,जारगाव मधिल नुरानी नगर मधिल खुला भुखंड आणी गाडगेबाबा नगर मधिल डेअरी हे सर्व व्यवसाय कोणत्या जागावर कसे सुरू आहेत हे जनतेला सांगायला नको.आज आमच्यावर आरोप करून जनतेची दिशाभुल करणार्‍यांचा येणार्‍या काळात कायदेशिर समाचार घेतला जाणार असुन राज्यात शिंदेगटाच्या माध्यमातुन मी जरी भाजपा पक्षासोबत असलो तरी मतदार संघात भाजपाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.किशोर पाटिल विरुध्द अमोल शिंदे हे चिञ कायम राहिल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.आमच्यावर झालेल्या आरोपा विरुध्द आम्ही मानहानीचा दावा लवकरच दाखल करणार असुन या दाव्या अगोदर कायदेशिर नोटिस देण्याचे काम पुर्ण करण्यात आल्याचीही माहीती त्यांनी यावेळी दिली.

पञकार परिषद सुरु होतांनाच आमदार किशोर पाटिल यांनी नगरपालिकेत सत्ता माझी होती त्यामुळे झालेल्या सर्व आरोपांना मी उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक हे शांत बसुन होते.आमदारांसोबत त्यांचे मिञ मुकुंद बिल्दिकर माञ या प्रकरणी आक्रमक भुमिकेत दिसुन आहे.या पञकार परिषदेत आरोपांचे खंडण करतांना विरोधकांवर आरोप झाले माञ आरोपांच्या खंडणाबाबत कोणतेही कागदपञे सादर करण्यात न आल्याने अनेक प्रश्न ही अनुत्तरीतच राहीली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्ट ऑफिसची लयभारी योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा 2500 रुपये मिळतील

Next Post

जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा

जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us