जळगाव, (प्रतिनिधी)- काल पासून मनीषा (उत्तर प्रदेश) च्या बद्दल च्या बातम्या व तिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकून मन हेलावून गेलं. जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात न्याय असा जातआधारित व धर्म आधारित मिळत असेल तर आपल्याला गप्प बसून कस भागेल? मन आक्रोश करते आहे काय गुन्हा होता मनिषाचा बाई असणे गुन्हा होता का ? की दलित समाजातील महिला असणे हा गुन्हा होता ?
आपण आज जर ह्या बद्दल बोललो नाहीत तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
या निष्पाप मुलीवर बलात्कार करणारे नराधम जितके जबाबदार आहेत त्यापेक्षा ही अमानुष अत्याचार तेथील पोलीस प्रशासनाने आणि राज्याच्या शासनाने या मुलीवर केले आहेत या घटनेला दडपून टाकण्यासाठी व आरोपींना संरक्षण देण्यासाठी जी कृत्य चालवली आहेत ती या देशाच्या आजवरच्या सर्व मानवी मूल्यांना काळिमा फासणारी आहेत त्यामुळे या घटनेचा कितीही तीव्र निषेध केला तरी तो कमीच आहे.

आम्ही मागणी करीत आहोत की या घटनेचे आरोपी यांना फाशी द्या तेथील पोलीस प्रशासन व यात प्रशासनातले जे ही सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी व योगी सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू करावी ही मागणी आजच्या धरणे आंदोलनात संविधान बचाव नागरी कृती समिती च्या वतीने करण्यात आली
योगी सरकार मुर्दाबाद -योगी सरकार बरखास्त करा
धरणे आंदोलनाला सुरुवात
सर्वप्रथम महात्मा गांधीजी प्रतिमेला पुष्पांजली वाहून व त्याच वेळी मृत पावलेल्या सर्व पीडितांना श्रद्धांजली देऊन धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम या धरणे आंदोलनाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांनी या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी उपस्थितांसमोर विदीत केली त्यानंतर हे निवेदन फारुख शेख यांनी वाचले
यांनी केले मार्गदर्शन
आमदार शिरीष चौधरी यांनी या उत्तर प्रदेश सरकारचा व खास करून योगीजी यांच्या कार्यकाळात होत असलेल्या अत्याचारांचा पाडा सादर केला माजी उपमहापौर करी मसाला यांनीसुद्धा हे सरकार कसे महिलांवर अत्याचार करणारे आहेत हे आकडे सादर केले संविधान बचाव चे भारत ससाने, इक्रा कॉलेजच्या प्राध्यापिका फिरदोस काजी, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्राध्यापिका कलावती पाटील, भारतीय विद्यार्थी संघटनेचे मुकेश सावकारे, जमात-ए-इस्लामी चे मुश्ताक काझी, मुलतानी बिरादरीचे फिरोज मुलतानी ,युवा संघटनेच्या अलफईज पटेल, ईकरा कॉलेज ची फरहान शेख, विद्यार्थी परिषद चे मुकेश सावकारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलिम इनामदार,भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष इरफान नुरी, छावा मराठा संघाचे अमोल कोल्हे, सुरेश चांगरे,जितू बागरे महेश चौधरी, भरत कर्डिले युवा संघर्ष मोर्चा ,श्रीकांत मोरे ,संजय महाजन आदींनी मार्गदर्शन केले
हाथरस उत्तरप्रदेश मधील पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मनिषाला न्याय मिळालाच पाहिजे !!
उत्तरप्रदेशातील पोलिसांच्या गुंडाराज चा तीव्र निषेध !
संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान उपस्थितांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना प्रतिभाताई शिंदे प्राध्यापिका कलावती पाटील सचिन धांडे
फारुक शेख यांच्या माध्यमाने निवेदन देण्यात आले
















