मनवेल ता.यावल (प्रतिनीधी) (नावरे ता,यावल ) फाट्या जवळ हरभराचे पोते भरलेला ट्रक अचानक पलटी झाला यात ट्रकची मागची दोन्ही चाके निघाली असुन सुदैवाने जीवीत हानी टळली असुन हि घटना आज २६ सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
यावल – चोपडा रस्त्यावर नावरे फाट्या जवळ यावल कडु चोपडा कडे हरभरा भरुन आलेला ट्रक क्र. एम एच 28 बी.बी.1653 शिरपुर येथे जात होता. नावरे फाट्या जवळ एका पुलाच्या साइडला असलेल्या संरक्षण कठड्यावरुन ट्रक गेल्यानंतर ट्रकची मागची दोन्ही चाकासह पट्टे जागेवर निघाली त्यामुळे ट्रक पलटी झाला असुन सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.