Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये धावले जळगावकर

Editorial Team by Editorial Team
September 18, 2021
in जळगाव
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये धावले जळगावकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. या रन ची सुरूवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. पोवाडा सादरीकरणनंतर दौड सुरू झाली. याप्रसंगी खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी दिनेश पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर आदी उपस्थित होते.

दौडच्या उदघाटनप्रसंगी खा.उन्मेष पाटील म्हणाले की, युवा पिढीचे तन, मन सदृढ राहण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया उपक्रम हाती घेतला आहे. युवक देशाचा आधारस्तंभ असून उद्याचा सदृढ भारत निर्माण व्हावा, यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थाचे महत्व ओळखावे. देशभरात साडेसात कोटी युवक आज या अभियानात सहभागी होत आहेत. तन, मन सदृढ ठेवण्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी, शरीर सदृढ राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीत जर आरोग्य सुदृढतेची जागरूकता झाल्यास देशाची संविधानिक मूल्ये जपण्यास देखील मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, भारतीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी. प्रत्येकाने सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वतःसाठी, देशासाठी फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त सतिष कुलकर्णी म्हणाले की, आजची तरुणपिढी व्याधीमुक्त राहण्यासाठी अशा दौडचे आयोजन महत्वपूर्ण असून प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रस्ताविकात नेहरू युवा केंद्राची माहिती विशद केले तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना फिट फॉर फ्रीडमचेही महती सांगितली. पोलीस कवायत मैदानावर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक मार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर शेवट करण्यात आला. दौडच्या उद्घाटनप्रसंगी विनोद ढगे यांच्या पथकाने पोवाडा सादर केला. ‘फिट इंडिया’ची शपथ दिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदर नोंदणी करून निवडकच विद्यार्थ्यांना या दौडमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, आकाश धनगर, चेतन वाणी, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे आदींसह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या दौडमध्ये बेंडाळे महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

Next Post

IRCTC मध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; जाणून घ्या तपशील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

IRCTC मध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; जाणून घ्या तपशील

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us