नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा सुरु आहे. स्वातंत्र्यवीर सावकारांना भारतरत्न देण्याबाबत काँग्रेसकडून विरोध होत असताना शिवसेना खासदाराकडून अशी मागणी होत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकारांना भारतरत्न देऊ असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. दरम्यान खासदार राजेंद्र गावित आधी भाजपमध्ये होते. विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेत दाखल झाले. आता त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी लोकसभेत केली आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपच्या जाहीरनाम्यातील मुद्दा शिवसेनेने उठवल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















