Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्तन कॅन्सर : वास्तव व गैरसमज !

najarkaid by najarkaid
October 6, 2020
in राज्य, आरोग्य
0
स्तन कॅन्सर : वास्तव व गैरसमज !
ADVERTISEMENT

Spread the love

स्तनांचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना होणारा सर्वाधिक प्रमाणातील कॅन्सर आहे व यातील एक तृतीयांश रुग्ण भारत, चिन व अमेरीका या देशांमध्ये आढळतात. गंभीर बाब म्हणजे विकसीत देशात स्तन कॅन्सरचे रूग्ण वयाच्या 60व्या वर्षी व प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. मात्र भारतासारख्या विकसनशील देशात सद्यस्थितीत स्तन कॅन्सरचे रूग्ण हे वयाच्या 40शीतच असतात व अ‍ॅडव्हान्स स्टेज मध्ये तज्ज्ञांपर्यंत पोहोचतात. विकसीत देशात स्तन कॅन्सरचे 80 टक्के रूग्ण रोग निदानानंतर सर्वसाधारणपणे 10 वर्षे जगतात. याउलट भारतासारख्या विकसनशील देशात फक्त 40 टक्के रूग्ण जगतात.

आधुनिक जीवनशैलीमुळे भारतात मागील 10 वर्षात शहरी त्याचबरोबर ग्रामीण भागात स्तन कॅन्सरचे प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. 2015-2016 च्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1,55,000 नविन रूग्णांना स्तन कॅन्सरचे निदान होत असून 76,000 रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. प्रत्येकी दोन मिनीटांनी एका महिलेस स्तन कॅन्सरचे निदान होत आहे. तर प्रत्येकी 13 मिनीटांनी एका महिलेचा या अतिभयंकर अशा स्तन कॅन्सरमुळे मृत्यू होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे तिशीच्या आसपास असलेल्या स्त्रीयांमध्ये सुद्धा याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत स्तन कॅन्सर सारख्या आजाराला रोखण्यास कमी पडत आहे. त्याची काही कारणे : 1) प्रमाणीत पूर्वतपासणीची पद्धत नाही. 2) कर्करोग तपासणी केंद्रांची संख्या कमी. 3) विभागीय कॅन्सर उपचार केंद्राची कमतरता. 4) आरोग्य विम्याचा अभाव. 5) संकोच, भिती, अज्ञान व अशिक्षीतपणा आणि भारतीय समाज जिवनामध्ये असलेले स्तन कॅन्सरबाबतचे गैरसमज ज्यामुळे भारतीय महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत न होता उशीरा होते. त्याचप्रमाणे उपचारासही विलंब होतो. ऑक्टोबर हा स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून संपुर्ण विश्वात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्तन कॅन्सर : वास्तव व गैरसमज दूर होण्यासाठी हा लेखन प्रपंच…
1) स्तन कॅन्सरची मला भिती नाही?
– स्त्री असणे हेच स्तन कर्करोग होण्यासाठी कारण पुरेसे आहे. 90 टक्के स्तन कॅन्सरग्रस्त स्त्रीयांच्या कुटूंबात यापूर्वी या आजाराचा इतिहास नसतो. ज्या कुटूंबात पूर्वी कोणाला झाला असल्यास त्याच्या संततीला हा आजार होण्याचे कारण 10 टक्के धोका अधिक असतो.
2) मासिक पाळी दरम्यान स्तनात दुखणे / जड होणे म्हणजे स्तन कॅन्सरची सुरूवात असू शकते का?
– नाही, मासिक पाळी शरिरातील होणार्‍या हार्मोन बदलामुळे येणारे नैसर्गिक ऋतूचक्र असते. हार्मोन (संप्रेरकांच्या) बदलांमुळे व शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे स्तनात जडपणा व दुखणे वाटू शकते. परंतु ही कॅन्सरची सुरूवात असू शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे स्तन कॅन्सरची गाठ ही दुखत नाही.
3) स्तन कॅन्सर हा संसर्गजन्य आहे का?
– स्तन कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नसून एकाव्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला ह्याची लागण होत नाही.

4) स्तन कॅन्सर हा फक्त महिलांनाच होतो का?
– स्तन कॅन्सर पुरूषांना देखील होतो. प्रत्येकी 1000 पैकी एका पुरूषाला स्तन कॅन्सर होऊ शकतो. वाईट बाब म्हणजे पुरूषांमधील स्तन कॅन्सर हा लवकर शरिरात पसरतो व त्यामुळे साधारणत: दोन वर्षात त्या रूग्णाचा मृत्यू होतो. म्हणून पुरूषांच्या छातीतील त्या भागात  कडकपणा जाणवल्यास त्वरीत शल्यचिकित्सकांचा सल्ला घेतला पाहिजे.
5) स्तनात आढळणार्‍या सर्वच गाठी कर्करोगाच्या असतात व स्तन कॅन्सर हा नेहमी गाठीच्या स्वरुपातच असतो का?
– नाही स्तनातील फक्त 10 टक्के गाठी ह्या कॅन्सरच्या असतात व स्तनातील गाठी व्यतिरीक्त इतर अनेक लक्षणे स्तन कॅन्सरची असतात. उदा. स्तनाग्रांतून रक्तस्त्राव, काखेतील गाठ, स्तनाग्रांच्या आजूबाजूस जखम / लालसरपणा होणे, स्तनाची कातडी लालसर किंवा संत्र्याच्या सालीप्रमाणे होणे, स्तनाग्रांचा आकार बदलणे, दोन स्तनांमध्ये असमतोल जाणवणे.
6) स्तन कॅन्सर इतर कॅन्सरप्रमाणे वयाच्या पन्नास / साठ वर्षांनंतरच होतो का?
– स्तनांचा कॅन्सर कोणत्याही वयोगटातील स्त्रीला होऊ शकतो. अलीकडच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे अगदी तिशी – पस्तीशीमध्ये असलेल्या स्त्रीयांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
7) स्तनपान व स्तन कॅन्सर या मध्ये काही संबंध आहे का?
– ज्या स्त्रीया स्तनपान करतात  त्यांच्यामध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण अत्यल्प आढळते. अपत्य नसणार्‍या स्त्रीयांमध्ये तुलनेने हे प्रमाण जास्त आढळते.
8) गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे स्तन कॅन्सर होऊ शकतो का?
– नाही, गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढत नाही. पण रजोनिवृत्तीनंतर वापरण्यात आलेल्या औषधी (हार्मोन्स) मुळे स्तन कॅन्सरचा धोका नक्कीच वाढू शकतो.
9) काही खाद्यपदार्थ अतिसेवनामुळे स्तन कॅन्सर होतो का?
– नाही, काही विशिष्ट खाद्यपदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे स्तन कॅन्सर होत नाही, परंतु मद्यपान, धुम्रपान व स्थुलपणामुळे स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढते.
10) दुर्गंधी घालवण्यासाठी काखेत किंवा शरिरावर लावण्यात येणार्‍या स्प्रे, परफ्युम किंवा डिओडरंट मुळे स्तन कॅन्सर होतो का?
– कुठल्याही वरील घटकांचा वापर केल्याने स्तन कॅन्सर होतो हे शास्त्रीयदृष्ट्या अजून सिद्ध झालेले नाही. परंतु कुठल्याही अशा बाबींचा अतिरेकी वापर केल्यास ते घटक कॅन्सर होण्यास जबाबदार होऊ शकतील, हे विसरता कामा नये.
11) गर्भावस्थेत स्तन कॅन्सर होऊ शकतो का?
– गर्भावस्थेतही स्तन कॅन्सर होऊ शकतो. 1 : 3000 या प्रमाणात गर्भावस्थेत तो आढळतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. गर्भावस्थेतील स्तन कॅन्सरचा उपचार हा इतर वेळेस होणार्‍या कॅन्सर प्रमाणेच म्हणजेच शस्त्रक्रिया, किमोथेरपी व रेडिओथेरपीद्वारे केला जातो. मात्र यात कॅन्सरची काही औषधी टाळणे गर्भाच्या सुदृढतेच्या दृष्टीने विचारात घेतले जाते. त्याचप्रमाणे (अ) गर्भ सुरक्षीत ठेवणे व उपचार करणे किंवा (ब) प्रथम गर्भपात करून नंतर कॅन्सरवर उपचार करणे हे दोन मुद्दे विचारात घेतले जातात.
12) स्तनांची स्व तपासणी ही लवकर निदानासाठी किती उपयोगी?
– स्तनांची स्व तपासणी पद्धतीत स्त्रीला स्वत:च्या स्तनांची तपासणी प्रत्येक महिन्याला ठराविक वेळी करायची असते. काही बदल अथवा गाठ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. परंतु ह्या निरीक्षणांची व निष्कर्षांची अचुकता ही त्या स्त्रीच्या शैक्षणिक, बौद्धिक व सामाजिक पातळीवर अवलंबून असल्यामुळे 100 टक्के प्रभावी पद्धत ही नाही. पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात व इतर बाबी जसे प्रतिकूल परिस्थिती, तज्ज्ञांची कमतरता यामुळे आजही स्तन स्व तपासणी ही लवकर निदानासाठी उत्तम उपाय आहे.
13) मॅमोग्राफी अहवाल साधारण (नॉर्मल) असल्यास काळजीचे कारण नाही का?
– ‘क्ष’ किरणांद्वारे स्तन तपासणीला मॅमोग्राफी म्हणतात तर सोनोग्राफीद्वारे स्तन तपासणीला सोनोमॅमोग्राफी म्हणतात. संयुक्तरित्या परिक्षण करून अहवाल दिल्यास अचुकता वाढते. मॅमोग्राफी ही दोन उद्दिष्टांसाठी केली जाते.
(अ) स्क्रिनींग : या तपासणीचा उद्देश स्तनात गाठ हाताला लागण्याआधी व स्तन
कॅन्सरची कोणतीही लक्षणे नसताना स्तन कॅन्सरच्या निदानासाठी आहे.
(ब) निदानात्मक मॅमोग्राफी : स्तन कॅन्सरच्या निदानाबाबत इतर तपासण्यांमध्ये (स्वपरिक्षण, डॉक्टरांकडून तपासणी) शंकर असल्यास मॅमोग्राफी सहाय्यक ठरू शकते. स्तन रक्षणात्मक शस्त्रक्रियेसाठीही मॅमोग्राफीचा उपयोग होतो.
मॅमोग्राफ स्क्रिनींग
100 महिला ज्या स्क्रिनींग करतात, त्यापैकी 90 महिलांचा मॅमोग्राफ नॉर्मल असल्याचे सांगितले जाते तर 10 महिलांना सोनोमॅमोग्राफी किंवा पुन्हा मॅमोग्राम स्क्रिनींगसाठी बोलावले जाते. त्या 10 पैकी 6 महिलांचा मॅमोग्राम नॉर्मल असल्याचा निर्वाळा दुसर्‍या तपासणीनंतर दिला जातो. तर उरलेल्या दोन महिलांना 6 महिन्यानंतर पुनर्रतपासणीसाठी व पाठपुराव्यासाठी बोलावले जाते र व उरलेल्या दोन महिलांना सुईद्वारे तुकडा काढून तो तपासणीसाठी पाठवण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे मॅमोग्राफी अहवाल नॉर्मल असला तरी नियमीत तपासणी व याबद्दलची जागरूकता महत्त्वाची आहे. मॅमोग्राफ निदान 100 टक्के अचूक असतेच असे नाही.
14) वार्षिक मॅमोग्राफी (क्ष किरण) तपासणीमुळे स्तन कॅन्सर होण्याचा धोका संभवतो का?
– मॅमोग्राफी करीता क्ष किरण (रेडीएशन) अत्यंत कमी प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे स्तन कॅन्सरचा धोका नसतो. त्याचप्रमाणे मॅमोग्राफीमुळे स्तन कॅन्सर शरिरात पसरत नाही.
15) स्तन कॅन्सरच्या उपचारासाठी लागणार्‍या किमोथेरेपी व रेडीओथेरेपीमुळे रुग्णास प्रचंड वेदना व त्रास होतो का?
– आजच्या काळात या दोन्ही उपचार पद्धतीत प्रचंड सुधारणा झाली असून त्यात सुरक्षितपणा आलेला आहे.
16) स्तन कॅन्सर झाला की शस्त्रक्रियेद्वारे (ऑपरेशन) पुर्ण स्तन काढावे लागते का?
– शस्त्रक्रियेचा प्रकार हा कॅन्सरच्या अवस्थेनुसार ठरतो. स्टेज 1 व 2 (स्तनातील गाठ 4 सें.मी. पेक्षा कमी व कॅन्सर इतरत्र पसरला नसल्यास) स्तन रक्षणात्मक शस्त्रक्रिया केली जाते व ही स्तन पूर्णपणे काढण्याच्या शस्त्रक्रियेइतकीच प्रभावी आहे.
17) स्तन कॅन्सर झाला तर मृत्यू अटळ आहे का?
– चुकीचे आहे. स्तन कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत (स्टेज 1 किंवा स्टेज 2) मध्ये झाल्यास व उपचार लवकर केल्यास स्तन कॅन्सरमुक्त जीवन जगण्याची संधी त्या महिलेस मिळू शकते. भारतात 80 – 90 टक्के रूग्ण स्तन कॅन्सरच्या 3र्‍या व चौथ्या टप्प्यात निदान व उपचारासाठी येतात. त्यामुळे लवकर निदान म्हणजेच भरपूर आशा या घोषवाक्याचा प्रचार प्रसार करून स्वपरिक्षण, तज्ज्ञांकडून तपासणी व मॅमोग्राफी या बाबतीत जनजागृती केल्यास स्तन कॅन्सरला आपण रोखू शकतो.

– डॉ. सौ. गितांजली नरेंद्र ठाकूर
सुखकर्ता फाउंडेशन
संचालिका, डिजीटल मॅमोग्राफी सेंटर, जळगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड -१९ रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी ‘कोविड कवच मोबाईल ॲप’

Next Post

राज्य सरकार ‘दिशा’ कायदा आणण्याच्या तयारीत…

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post

राज्य सरकार ‘दिशा’ कायदा आणण्याच्या तयारीत...

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us