Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोशल मीडियावरही बंदीचा सरकारचा प्लान?; पवारांची लढ्याची हाक

najarkaid live by najarkaid live
December 19, 2019
in राज्य, राजकारण
0
सोशल मीडियावरही बंदीचा सरकारचा प्लान?; पवारांची लढ्याची हाक
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातील तरुणांनी केलेला जोरदार विरोधच भविष्यात सत्तांतर घडवून आणणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नागपूर येथे बोलताना दिला. नागरिकत्व कायद्यानंतर सोशल मीडिया बंदी कायदा करण्याचाही निर्धार होत असून हा कायदा देशातील सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी भाजपविरोधी शक्तींना एकत्रित करून ठोस कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली. 

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नागपूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करताना देशभरातून त्यांना विरोध होणार नाही अशी अपेक्षा केली होती. मात्र केंद्र सरकारच्या या दाव्याला देशभरातील तरुणांनी छेद दिला असून जो निषेधाचा सूर या कायद्याविरोधात उभा राहिला आहे तो निश्चितच पुढील सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. सन १९७७ मध्ये देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. तरुणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतरामध्ये झाला होता, याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली.

केंद्र सरकार आता सोशल मीडिया बंदी कायदा आणण्याचा प्रयत्न करत असल्याकडे लक्ष वेधताना पवार यांनी हा कायदा भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याची टीका केली. काही कारणास्तव सोशल मीडिया नकारात्मक वाटत असला तरी त्यावर बंदी आणणे हा अंतिम उपाय नाही. या कायद्याला रोखण्यासाठी देशभरातून भाजपविरोधी सर्व पक्षांची मोट बांधून त्याविरोधात ठोस लढा उभारावा लागेल. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने या संघर्षात उतरेल, असा निर्धारही पवार यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्लीत जमावबंदी; इंटरनेट, मेट्रोही बंद

Next Post

मनमोहन सिंहांचं ते भाषण भाजपने बनवलं ‘अस्त्र

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मनमोहन सिंहांचं ते भाषण भाजपने बनवलं ‘अस्त्र

मनमोहन सिंहांचं ते भाषण भाजपने बनवलं 'अस्त्र

ताज्या बातम्या

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us