चाळीसगाव(किशोर शेवरे) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिनांक 24 एप्रिल रोजी चाळीसगाव बाजार समितीच्या सभागृहात भुसार मालाचे मार्केट सुरू करण्याबाब बैठक घेण्यात आली यावेळी निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीस प्रांत अधिकारी साहेब लक्ष्मीकांत सताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड,तसेच बाजार समितीचे संचालक रवीआबा पाटील, महेंद्र बापू पाटील, ऍड आर एल नाना पाटील, प्रदीप दादा देशमुख, कल्याणराव पाटील, बळवंतराव वाबळे, धर्मा बापू काळे, जितेंद्र वाणी, मच्छिंद्र राठोड, सचिव अशोक पाटील, तसेच बाजार समितीचे व्यापारी, कर्मचारी यांच्या उपस्तिथीत बैठक पार पडली. सदर बैठकीत सोमवार दिनांक 27 एप्रिल पासून एका दिवसाआड भुसार मार्केट सुरू करणेबाबत निर्णय घेण्यात आला. बाजार समितीतून टोकन मिळाले नंतरच शेतीमालाचा लिलाव केला जाईल. तसेच कांदा मार्केट सोमवार ते शुक्रवार सुरू राहील. भुसार व कांदा या शेतीमालाचे फक्त दर दिवसाला 100 टोकन देणेबाबत निर्णय घेण्यात आला. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आव्हान चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.














