Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेवाभावी संस्थांसाठी तगण्याचं ऑक्सीजन ठरतंय हेल्प-फेअर !

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in सामाजिक
0
यश मिळविण्यासाठी नियोजन,शिस्तीला महत्व – डॉ.तळवलकर
ADVERTISEMENT

Spread the love

  • सेवाभावी संस्थांसाठी तगण्याचं ऑक्सीजन ठरतंय हेल्प-फेअर
  • हेल्प-फेअरमुळे आजवर अनेक संस्थांना झाला लाभ  

जळगाव – ऑक्सीजन….जगण्यासाठी सर्वात आवश्यक प्राणवायु. आॕक्सीजन नसेल तर गुदमरण्याचा अनुभव यायला सुरूवात होते. ज्या प्रमाणे चालत्या फिरत्या व्यक्तींना याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे संस्थांना देखील. त्यातही या संस्था जर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या असतील तर त्यांना तर याची सर्वाधिक आवश्यकता भासते. आणि अश्याच सामाजिक संस्थांसाठी जणू प्राणवायू ठरत आहे हेल्प फेअर. काय आहे हेल्प फेअर आणि सेवाभावी संस्थांसाठी नेमके काय कार्य करते, याचा नेमका या संस्थांना कसा, किती आणि काय लाभ झालाय  आणि होतोय या गोष्टींचा घेतलेला हा आढावा संस्था चालकांच्या शब्दांत येत्या 15 ते 17 फेब्रुवारी 2020 दरम्यान सागर पार्क जळगाव येथे पार पडणाऱ्या हेल्प फेअर 3 च्या पार्श्वभूमी वर.

सौ. हर्षाली चौधरी – उडान फाऊंडेशन, जळगाव.
दोन वर्षापूर्वी मला हेल्प फेअर बद्दल कळाले. सामाजिक संस्थांची अशी प्रदर्शनी आपल्या जळगाव शहरात प्रथमच होत होती. त्यापूर्वी उडानचे काम सुरुच होते. पण हेल्प फेअर मध्ये पहिल्याच वर्षी सहभाग नोंदविला आणि या प्लॅटफॉर्म वरुन एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत उडानचे कार्य गेले. आमच्या सारखे कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना भेटण्याची आणि त्यांच्या कार्याची पद्धती समजण्याची संधी मिळाली. यातील काही संस्थासोबत मिळून लवकरच काही प्रकल्पांवर काम करण्याचा मानस आहे. हेल्प फेअरच्या माध्यमातून दिव्यांगांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात का असेना पण बदलतांना दिसतोय हे आशादायी चित्र आहे. गरजू आणि दानशूर यांना जोडणारा हेल्प फेअर हा एक सेतूच आहे.

श्री. सुनिल देवरे – रोशनी बहुउद्देशिय संस्था, पारोळा.
सामाजिक क्षेत्रात काम करतांना लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन दुर्दैवाने तसा वाईट होता. घरच्या भाकरी खा आणि लष्करी काम करा असा काहीसा हा प्रकार होता. परंतु हेल्प फेअर मध्ये सहभागी झालो आणि आम्ही नेमके काय कार्य करतो, कश्या परिस्थितीत करतो हे लोकांना या माध्यमातून समजायला लागले. हेल्प फेअरमुळे अनेक डाॕक्टर आणि एम.आर.शी आम्ही जूळले गेलो. त्यामुळे गरजू रुग्णांना मदत होण्यास हातभार लागला. रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी डाॕक्टरांची फळी या निमित्ताने उभी करता आली.

श्री. दत्ता तावडे – वृक्षवल्ली प्रतिष्ठान, पाचोरा.
आधी वृक्षवल्ली प्रतिष्ठानचे कार्य पंचक्रोशी पूरता मर्यादित होते. हेल्प फेअर बद्दल माहित झाले. या प्रदर्शन मध्ये सहभागी झालो आणि आमच्या कार्याची माहिती जिल्ह्यात झाली. यामुळे आमचे काम अनेकांपर्यंत पोहोचले. एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत पोहचणे आम्हाला शक्य झाले नसते ते हेल्प फेअरमुळे घडून आले. हेल्पफेअरने आमच्या कार्याला नवी ओळख दिली. सामाजिक संस्था चालवितांना काम कसे करावे, कामाला दिशा, गती कशी द्यावी हे हेल्प फेअरच्या कार्यशाळांमध्ये सहभागी झाल्यावर समजले. हेल्प फेअरमुळे ग्रामीण सोबतच शहरी लोक देखील आमच्या कार्यात सहकार्य करु लागले.

श्री. सागर धनाड – छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान, जळगाव.
हेल्प फेअरमुळे आम्हांला अनेकांना भेटण्याची, त्यांच्याशी जुळण्याची आणि आमचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची संधी मिळाली. पाणलोट, वृक्ष लागवडीचे महत्त्व या निमित्ताने लोकांना कळाले. हेल्प फेअरच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्यासाठी मदत झाली आणि गाडेगाव येथे माथा ते पायथा पाणलोटाचं काम लोकसहभागातून शक्य झालं. या निमित्ताने सरपंच, गावकरी आमच्या मदतीला आले. आता या गावात सहली येतात. हेल्प फेअरमुळे सेंद्रिय शेतीच्या कामाला ओळख मिळाली. अनेकांनी सेंद्रिय शेतीची सुरूवात केली.
श्री. राजमोहम्मद शिकलगार – जन मानवता बहूउद्देशिय संस्था, चोपडा.
कँसर आणि कँसर रुग्णांविषयी आजही समाजात अनेक गैरसमज आणि जनजागृतीचा अभाव आहे. हेल्प फेअर सारखे प्लॅटफॉर्म मिळाल्याने एकाच वेळेस हजारो लोकांपर्यंत जनजागृती करणे सोपे झाले. गेल्या दोन वर्षात हजारो लोकांशी हेल्प फेअरमुळे आम्ही जुळलो आहोत.
हेल्प फेअरमुळे आमच्या कार्याची दखल शासकीय अधिकाऱ्यांनी देखील घेऊन वेळोवेळी सहकार्य केले आहे. हेल्प फेअरमुळे अनेक रुग्णांना मदत मिळवून देण्यास हातभार लागला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा महाविद्यालयात नॅक समितीची भेट विविध विभागांची पाहणी, विद्यार्थी माजी विद्यार्थी व संस्थाचालकांशी साधला संवाद

Next Post

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us