Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती.. पदभारही स्वीकारला

najarkaid by najarkaid
February 28, 2021
in Uncategorized, राज्य
0
सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती.. पदभारही स्वीकारला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 28: राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. कुंटे यांनी श्री. संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.

सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात श्री. कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे असलेले श्री. कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. १९८६ मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून त्यांनी काम पाहिले.

२०१२ मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), प्रधान सचिव (व्यय) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्रशिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. २७ ऑगस्ट २०२० पासून ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

राज्यपालांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गृहनिर्माण, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यानंतर ते वन विभागाचे सचिव झाले. महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. ऑक्टोबर २०१० मध्ये वन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. या सर्व महत्त्वाच्या पदांच्या जबाबदारी बरोबरच त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव, धुळे व बीडचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव, मुंबई महापालिकेचे उपायुक्त, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, म्हाडाचे उपायुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्ह्यात ‘चारशे’ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

उद्या पासून राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन

Related Posts

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय

उद्या पासून राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us