सावदा, प्रतिनिधी – सावदा दुय्यम निबंधक कार्यालय सावदा या कार्यालयात यावल रावेर तालुक्यातील मालमत्ता धारक नागरिक यांचे शेत, प्लॉट, खरेदी विक्री व्यवहार नजरगहान, बक्षीस पत्र आदी कामे या कार्यालयात केली जातात. सकाळी 10 ते 6 पर्यंत कामकाज चालते सर्व व्यवहार कॉम्प्युटर वर असून लाईंट गेल्यास इन्व्हर्टर नसल्याने कामकाज होत नाही. लाखो रूपये महसूल शासनाला मिळत आहे. दररोज 25 ते 30 खरेदी, विक्री, नजर गहान, बोजा लावने कमी करणे, बक्षीस पत्र, हक्कसोड आदी व्यवहार सुरु आहे.
पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना तासनतास या ठिकाणी बसावे लागते. परिसरात स्वच्छता नसल्याने नाही जमिनीवर उभे राहता बसता येत नाही माकोडे देतात त्रास. सकाळी 10 ते 1 पर्यंत कॉम्प्युटरवर कामे होतात दुपारून कॉम्प्युटर हळू चालत असल्यामुळे कामे होत नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
कार्यालयात कर्मचारी कमी असल्यास स्टॅम्प व्हेंडर यांना कॉम्प्युटर वर कामे करावी लागतात. याकडे लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी.