Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री जेव्हा कृषि निविष्ठांच्या दुकानात जातात…

najarkaid live by najarkaid live
June 21, 2020
in शेती
0
सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री जेव्हा कृषि निविष्ठांच्या दुकानात जातात…
ADVERTISEMENT

Spread the love

  • शिल्लक असतानाही खते, बियाणे शेतकऱ्यांना न दिल्यास
  • विक्रेत्यांवर कठोर कारवाई- कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २१: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले.

खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री श्री. भुसे यांनी आज दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषिमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.

दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देतानाच स्टॉक रजिस्टरची मागणी कृषिमंत्र्यांनी केली. ते घरी असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही यावर कृषिमंत्री श्री. भुसे यांनी तीव्र नाराजी दर्शविली. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरीयाच्या १३८६ पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या प्रकाराने व्यथीत झालेल्या कृषिमंत्र्यांनी औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या आणि दुकानातूनच कृषि विभागाच्या सचिवांना दूरध्वनी करून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या.

राज्यभरातील कृषि निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा ; केंद्रीय समितीचे निर्देश

Next Post

मनरेगाने दिली नागरिकांना कामाची हमी ;कोरोनाकाळात ग्रामीण भागात नव्हती कामांची कमी

Related Posts

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

December 18, 2025
महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

Kisan Credit Card Update : आता शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज, कमी व्याजदर, आर्थिक मदत!

August 9, 2025
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

July 31, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

July 15, 2025
Next Post
राज्यात मागेल त्याला काम, काळजी करू नका

मनरेगाने दिली नागरिकांना कामाची हमी ;कोरोनाकाळात ग्रामीण भागात नव्हती कामांची कमी

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us