- अनेक शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
पाचोरा- सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि व्यापार,उद्योग,शेतकरी
आत्महत्या,बेरोजगारी,महागाई अशा सर्वच आघाड्यांवर अयशस्वी झालेल्या या सरकारला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका या जोषाचे रुपांतर मतात होऊ द्या असे आवाहन राज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी येथील महापुरे मंगल कार्यायात माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा संवाद यात्रेच्या समारोपात राष्ट्रवादी कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पाया पडायला लावणार्या आमदार किशोर पाटील यांना पक्षातून धक्के मारून बाहेर काढा असे देखील ते म्हणाले.
यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात शिवसेना बीजेपी सरकारवर कडाडून टीका केली. राम मंदिर,एअर स्ट्राइक यासारख्या गोष्टी करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी,महागाई यासारख्या समस्या दिसत नाहीत तर पेंग्विन मेल्यावर डोळ्यात पाणी आणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शेतकऱ्याच्या मरणाचं सोयरसुतक नाही असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कपाशीला सात हजार रुपयांचा भाव मिळावा म्हणून उपोषण करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपले सरकार असताना मात्र सतेचाळीसशे रुपये भाव कपाशीला जाहीर होत असताना शांत बसतात यापेक्षा मोठी लाचारी कोणती असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.आज शेतकरी, तरुणवर्ग, व्यापार-उद्योग, बेरोजगारी स्त्री व सुरक्षा याविषयी सरकार बोलायला काहीही तयार नाही तर जो कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवेल त्यांना ईडीचा उपयोग करून धारेवर झाले जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा कुठल्याही बँकेशी काहीही संबंध नसताना किंवा ते संचालक नसताना देखील त्यांना नोटीस पाठवली जाते यावरून हे सरकार केवळ विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.21 तारखेला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 24 तारखेला होत असल्यामुळे या तीन दिवसातच हे सरकार पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करेल अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्या या सरकारने शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे यांना सत्ता आली तर मुख्यमंत्री करू असे जाहीर करून दाखवावे असे आव्हान देखील त्यांनी सरकारला दिले.
यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर कडाडून टीका करताना आमदार केवळ खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखविण्याची योग्य वेळ आज आली असल्याचे त्यांनी सांगितले .जनतेशी आमदारांची कुठलीच नाळ जोडलेले नसून त्यामुळेच आमदार इतरांनी केलेल्या कामाचे देखील श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असून दिवंगत माजी आमदारांचा देखील अपमान करत असल्याचे सांगितले तर शासकीय योजनांची लूट सुरू असून आमदार आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर यांचेकडून मलिदा लाटण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसीच्या आमदारांचा एमआयडीसीचा दावा देखील पोकळ असल्याचे यावेळी आमदार माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन तावडे यांनी केले तर
मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी न.पा.गटनेते संजय वाघ,विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे, पाचोरा तालुका अध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष सतीश चौधरी,भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव ,भडगाव शहराध्यक्ष शामकांत भोसले, पाचोरा महिला तालुकाध्यक्ष सरलाबाई पाटील, पाचोरा महिला अध्यक्ष शहराध्यक्ष जयश्री मिस्त्री, चंदू केसवानी,भडगाव महिला शहराध्यक्ष सुरेखाताई पाटील,जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख,संजय गरुड,कल्पना पाटील,योजना पाटील,प्रदेश प्रतिनिधी शालिग्राम मालकर,रसूल उस्मान,अझर खान,ललित वाघ,विश्वासराव भोसले,सुचेता वाघ,वासुदेव महाजन, विकास पाटील, अशोक मोरे,रणजीत पाटील,शरद पाटील,अरुण देशमुख,भूषण वाघ,सुरेखा पाटील,मंगला शिंदे,मोतीलाल चौधरी, भगवान मिस्त्री,मच्छिंद्र थोरात, सुनील पाटील, भगवान पाटील, डी के पाटीलफाईम शेख,,नीलिमा पाटील, प्रकाश पाटील, दत्ता पवार,अब्दुल गनी शेख,शिवा बापू महाजन,अशोक मोरे,हेमराज पाटील, डॉ विजय देशमुख,हर्षल पाटील, स्वप्नील पाटील, संतोष जाधव, विजय पाटील, विनोद पाटील, प्रशांत माळी, रामचंद्र राठोड,सचिन पाटील, सुदर्शन महाजन,प्रदिप वाघ,नितीन पाटील, रवींद्र पाटील,बंटी महाजन, दामू पाटील,गौरव पाटील, अशोक पाटील,रवींद्र चव्हाण, बशीर बागवान,सुनील शिंदे,संदीप जडे यांचेसह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
अनेक शिवसैनिकांचा राष्ट्रवादी प्रवेश
यावेळी भडगाव तालुक्यातील जुवार्डी गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते विजय अहिरे, दिपक अहिरे,धर्मेंद्र भालेराव, देविदास अहिरे, दीपक आहिरे ,भूषण आहिरे ,अनिल अहिरे, वसंत नाईक, संदीप मरसाळे, तर खडकदेवळा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शांताराम दाभाडे, आयुब पठाण, बालू बनसोड, जब्बार मन्यार, हबीब शहा गुलाब शहा, इस्माईल शेख, सिकंदर शहा ,राहुल तेली ,हसन तडवी ,समाधान तेली ,नसिर शहा, कृष्णा मोरे, सलीम तडवी, अंकुश चंदनशिव ,जलील तडवी ,नवाब शेख, दिलीप दाभाडे,भैय्या गायकवाड, अमिन तडवी, गणेश शिंपी, दगडू तडवी, रवि निकम, मुन्ना ड्रायवर, सागर दाभाडे, निलेश तेली, वाल्मीक तेली, प्रमोद तेली, नितीन तेली, राजेंद्र पाटील, यांचेसह सिंधी कॉलनी शाखाध्यक्ष बापू चौधरी गोलू राजपूत अक्षय राजपूत, निलेश जाधव ,सागर कोळी, पप्पू पाटील, विशाल खैरनार, अतुल खैरे,सचिन सोनवणे, ललीत राजपूत, समाधान चौधरी, सागर गायकवाड यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.