Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

najarkaid live by najarkaid live
October 1, 2020
in अग्रलेख
0
सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक
ADVERTISEMENT
Spread the love

सागर तायडे हे नाव अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात स्तंभ लेखक म्हणून आदराने घेतल्या जाते. त्यात मुंबई, कोल्हापूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला, चंद्रपूर,औरंगाबाद, परभणी, बीड,लातूर, नांदेड अशा अनेक ठिकाणी लोकांना माहीत झाले आहे. याचे कारण की त्याचे अनेक न्यूज पेपर मध्ये लेख प्रसिद्ध होत असतात. आणि ते निर्भीडपणे वास्तववादी लिखाण करतात. ते म्हणतात की मला वाचनाची आवड आणि लिहिण्याची गोडी निर्माण करणारे त्याचे जिवलग मित्र काळकथित विजय गोविंद सातपुते आणि कॉम्रेड शरद पाटील हे होत. त्यांच्या मुळे सागर तायडे नावाची ओळख निर्माण झाली असे ते अभिमानाने सांगतात. त्यांनी मला सक्तीने वाचन करण्यास प्रवृत्त केले. आणि त्यानंतर टिपण काढण्यासाठी सांगितले. ते आपल्याला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार्‍या चांगल्या मित्राचे नाव घेण्यास विसरत नाही हा त्याचा प्रामाणिक गुण आहे. आणी म्हणून त्यावर काही लिहावे असे वाटले.
सागर तायडे यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1961 रोजी मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गाडेगाव खुर्द, तालुका जळगाव (जामोद), जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झाले. पुढे हायस्कूल ते सुनगाव, तालुका जळगाव (जामोद), जिल्हा बुलढाणा येथे झाले. पुढे त्यांनी मुंबई या ठिकाणी शिक्षण घेतले. त्यांना लिखाण करण्यास प्रोत्साहन विजय सातपुते आणि शरद पाटील यांनी दिल्यामुळे त्यांचा पहिला लेख अब्राम्हणी सत्यशोधक मासिक ला पाठविला आणि त्यात तो छापुन आला. कामगार चळवळीत काम करीत असल्यामुळे आणि तल्लख बुद्धी असल्याने त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आणि गोर गरीब कामगाराच्या व्यथा संदर्भात लिखाण केले. आणि न्यूज पेपर मध्ये दिले. ते वास्तव असल्याने आणि ते पोटतिडकीने लिहीत असल्याने त्यांच्या लेखाची दखल अनेक दैनिकानी घेतली. त्यात संध्या दैनिक महानगर, दैनिक आज दिनांक,दैनिक जनशक्ति, दैनिक नवशक्ति,दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, विटोपावर,  महानगरी वार्ता, प्रजासत्ताक भारत, दैनिक देशोन्नती, दैनिक विश्वपथ मुंबई, दैनिक मुक्तनायक,कोल्हापूर, दैनिक वृत्तरत्न सम्राट, बहुजनरत्न लोकनायक, दैनिक जनतेचा महानायक,
त्यांच बरोबर अनेक साप्ताहिक, पाक्षिक,आणि मासिक यामध्ये ही सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक संदर्भात लेख आली. त्यात युगप्रबोधन, आम्रपाली, धम्म यान, पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा सेवा संघांचे मुखपत्र  “मराठा मार्ग” मासिक मध्ये दोन वर्षे नियमितपणे लेख प्रसिद्ध झाले. संपूर्ण महाराष्ट्रात तेव्हा आठ ते दहा दैनिकात लेख प्रसिद्ध होत असल्याने सागर तायडे हे नाव महाराष्ट्रात परिचित आहे, झाले. वाचक त्यांना साहित्यिक, विचारवंत, लेखक, पत्रकार, कवी ओळखायला लागले. ते असंघटित कष्टकरी नाका कामगरांची संघटना चालवितात त्याच बरोबर त्यांनी मुंबई मध्ये मुंबई पत्रकार संघ, महाराष्ट्र मुक्त पत्रकार महासंघ, महाराष्ट्र मुक्त पत्रकार व पत्रलेखक संघ, मराठी पत्रलेखक संघ यांच्या पत्रकार प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता त्यामुळे बातमी कशी लिहावी याचे प्रशिक्षण झाले होते आणि त्याच बरोबर लिखाणाला गती मिळाली. म्हणून ते भरपूर लिखाण ही करतात. मुंबई मध्ये दैनिक विश्वपथ मधे दर गुरुवारी सागर लाटा म्हणून या नावाखाली सागर तायडे याचा नियमित लेख प्रसिद्ध होत होतात. दैनिक विश्वपथचे संपादक, दिनकर सोनकांबळे आणि उपसंपादक गुणाजी काजीर्डेकर यांनी सागर तायडे यांच्या लेखाला “सागर लाटा” हे नाव दिले. अलीकडे दैनिक मुक्त नायक कोल्हापूर मध्ये देखील मुक्त सागर लाटा म्हणून सतत त्यांचे लेख येत असतात. त्याचा अनेक विषयावर अभ्यास आहे. ते चांगले वक्ता ही आहेत. आणि नैतिकतेला विशेष प्राधान्य देतात. असंघटित कामगार संघटना चालवित असल्याने त्याचे ते नेते असल्याने, गरिबी काय असते त्यांना त्याची जाणीव आहे.
आज त्यांची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली. ते खरे अभ्यासू व्यक्ति म्हणुन साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक सन्मानाने त्यांचे नाव घेतात. आंबेडकरी चळवळीतील निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण प्रदेशा मध्ये निर्भीड स्तंभलेखक म्हणून त्यांची ख्याती झाली आहे. आज महाराष्ट्रात ते सर्व परिचित झाले आहेत.
सागर तायडे खर तर सामाजिक जाणिवेतून निर्माण झालेला निर्भीड पत्रकार, लेखक, वक्ता, कामगार नेता आहे. ते सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. ते आज अध्यक्ष आहे आज देशात कोठेही असंघटित नाका कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्कासाठी लढताना दिसत नाही. पण सत्यशोधक कामगार संघटना हे सतत 1982 पासून त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढत आहे. त्याच बरोबर त्यांचे दुखणे, व्यथा अनेक दैनिकात लेखाच्या माध्यमातून, या सभा संमेलनात सहभागी होऊन भाषणातून सागर तायडे मांडताना दिसतात. त्यांचे हृदय विशाल आहे. महाराष्ट्रातील संस्था, संघटना यांचे समन्वय करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात असंघटित सुरक्षा परिषद स्थापन केली. आणि ते 2012 पर्यंत अध्यक्ष होते. त्याच बरोबर ते भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगाराच्या फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु)चे ते राज्य अध्यक्ष आहेत. बावीस राज्यात व सतरा क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी आय एल यु शी जोडल्या गेले आहेत. त्याच बरोबर सागर तायडे यांनी अनेक व्यक्तिला, शिक्षकांना, शिक्षिकांना नवीन लेखकाना लिहिण्यास प्रवृत्त केले. त्यात भिमराव परमगोल, तेल्हारा बुलढाणा यांनी मला सांगितले आणि अनेक महिला लेखिका यांनाही लिहिण्यास प्रोत्साहन दिले. असे ही काहीनी सांगितले. त्याच बरोबर प्रशांत सागर तायडे यांचा लेख “शून्यातून विश्व निर्माण करणारी मुलगी पत्नी आणि आई” हा लेख दैनिक विश्वविजेता बुलढाणा आणि दैनिक राजस्व सोलापूर सह अनेक दैनिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात प्रशांत नि अत्यंत चांगली महिला कशाला म्हणतात, त्याची लक्षणे कोणती असतात, या संदर्भात प्रशांत नि मांडणी केली होती. तो दिवस 27 सप्टेंबर 2020 म्हणजे जागतिक कन्या दिवस होता. अगदी त्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी प्रशांत च्या आई चा म्हणजे चंद्रकला ताई चा वाढदिवस होता. मी प्रशांत चे आर्टीकल वाचले त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील पान क्रमांक, 253/254 मधील भगवा न बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पाचवा, उपासकासाठी जिवन नियम(विनय) पान क्रमांक 306 ते 312 मधील उतारा वाचण्यासाठी प्रशांत ला सांगितले आणि आर्टीकल लिहिण्यास प्रवृत्त केले. ते आर्टीकल मी वाचले आणि प्रशांत ला फोन केला. त्याचे अभिनंदन केले. मी त्याला सहज विचारले तो म्हणाला की मला सतत पापा लिहिण्यास प्रवृत्त करतात. मी थोडा अभ्यास केला आणि माझ्या शब्दात लिखाण केले. हे शब्द प्रशांत च्या मुखातून जेव्हा मी येकले त्यावेळेस त्यावेळी माझ्या मनात अशा अनेक लोकांना लिहिण्यास प्रोत्साहित करणाऱ्या लेखका संदर्भात लिहावेसे वाटले मी स्वतः अविनाश टिपले त्यांना मागील पाच सहा वर्षापासून ओळखतो. त्यांचे अनेक लेख मी वाचलीत. मी स्वतः लेखक असल्याने मला अनेकांनी त्यांच्या संदर्भात सांगितले. तेव्हा मला वाटले की आपन त्यांच्या संदर्भात लिहले पाहिजे. ज्यानी अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, त्यांनी अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कामगारांच्या समस्या संदर्भात सडेतोडपणे स्तंभ लेखन केले, अनेकांना लिहिण्यास प्रोत्साहित केले. मुलालाही प्रोत्साहन दिले. अतिशय चांगल्या पद्धतीने परिवार सांभाळला. ज्ञान असलेला, जाण आणि वास्तव्याची भान असलेला, नीतिमत्ता जोपासणारा, निर्व्यसनी, सुदृढ, वक्ता, अशा निर्भीड लेखका बद्दल लिहावेसे वाटले. त्यांचा वाढदिवस 3 ऑक्टोबर रोजी 59 वा आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी रिपब्लिकन पक्षाचा 63 वा वर्धापन दिवस आहे. 3 ऑक्टोबर 1957 ला विजया दशमी होती आणि अवघ्या चार वर्षानी सागर तायडे यांचा जन्म होतो. त्याच लिखाण हे अतिशय भारतीय समाज हिताचे आहे. निर्भीड निरपेक्षपणे त्यांचे लिखाण आहे. सागर तायडे या निर्भीड लेखकास अविनाश टिपले कडून वाढ दिवसाच्या निमित्ताने शुभेछा तथा पुढील वाटचालीसाठी हार्दिक मंगल कामना.
अविनाश टिपले चंद्रपूर 7875909804.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनासाठी करण्यात येणारी ‘एचआरसीटी चेस्ट’अत्याधुनिक रेडिओलॉजिकल चाचणी

Next Post

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी अनिल कान्हे यांची निवड

Related Posts

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

December 4, 2024
कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

December 31, 2022
धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

October 5, 2022

अहंकार मुक्त गावकी आणि भावकी..!

October 28, 2020
कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

May 6, 2020

कोरोनाशी लढतांना – “अंतर” महत्त्वाचे !

April 29, 2020
Next Post

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी अनिल कान्हे यांची निवड

ताज्या बातम्या

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

September 9, 2025
Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

September 9, 2025
महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

September 9, 2025
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

September 9, 2025
प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

September 9, 2025
पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं  ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

September 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us