Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सफाई कर्मचारी हेच त्या-त्या गावाचे खरे नायक

पाळधी येथे “स्वच्छता ही सेवा” अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
September 27, 2024
in Uncategorized
0
सफाई कर्मचारी हेच त्या-त्या गावाचे खरे नायक
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव (प्रतिनिधी) दि. 21 -आरोग्याचा खरा मंत्र स्वच्छता असून “ स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ” ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामुहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत असून ही बाब शासनासाठी उत्साहवर्धक आहे. स्वच्छता ही केवळ गरजच नाही तर ती एक सवय झाली पाहिजे. बाह्य स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता झाली पाहिजे. यासाठी मन आणि गाव दोन्ही स्वच्छ ठेवा. प्रत्येकाने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी. स्वच्छता करणारे प्रत्येक सफाई कर्मचारी हेच त्या – त्या गावाचे खरे नायक असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम यासाठी भाऊसो गुलाबारावजी पाटील शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम प्रमाणे देशभरात मोठ्या उत्साहात राबविले जात आहे. स्वच्छता अभियान केवळ 2 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

‘करूया वाईट विचार नष्ट – स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’

“स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ कार्यक्रम प्रसंगी स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 3 या प्रमाणे 45 सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छ्ता मित्र’ म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बुके देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘करूया वाईट विचार नष्ट – स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ बाबत सर्वांना स्वच्छते बाबत तसेच प्लास्टिक व थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध बाबत सामुहिक शपथ देण्यात आली व सतत स्वच्छता टिकविण्यासाठी संकल्प करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. दि.17 सप्टेंबर 2024 ते दि. 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची “ स्वच्छता ही सेवा “ मोहिमेत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित केली आहे. अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग नोंदवून गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम टिकविण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेवून जनजागृती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” बाबत सविस्तर माहिती विशद करून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन स्वच्छता तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले. तर आभार सहायक गट विकास अधिकारी कैलास पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पाळधी बु. आणि खु. ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी केले होते.

यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे समन्वयक डॉ. सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, सरपंच विजय पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक , उपसरपंच दशरथ धनगर, शरद कोळी, प्रा. आ. केंद्राचे डॉ. चेतन अग्निहोत्री, ग्रामपंचायत सदस्य कैलास इंगळे, मच्छिंद्र साळुंखे, राहुल धनगर, निसार शेख, रामचंद्र सोमाणी, शेख मलिक, गणेश माळी, दयानंद कोळी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , स्वच्छता विभागाचे पी. आर. सी./सी.आर.पी., जिल्ह्यातील स्वच्छता मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरे यांची थेट पात्रता काढली, राज्यातील राजकारण तापलं!

Next Post

ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी

ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us