भडगांव – येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी व गुणगौरव सोहळा नुकताच येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात पार पडला.
सावता महाराज यांची पुण्यतिथी व गुणगौरव सोहळ्या प्रसंगी मान्यवरांनी सावता महाराज, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस माल्यार्यांपण करून दिप प्रज्वलन केले.या सोहळ्यास प्रास्ताविक सादर करण्यात आले. सावता महाराज यांची मिरवणुक रथ मार्गाने मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या सोहळ्यास अध्यक्ष स्थानी भडगांव येथिल तहसिलदार गणेश मर्कड होते व नगराध्यक्ष अतुल पाटील, पोलिस निरीक्षकधनंजय येरूळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, सौ.ललिता वाघ, विजय महाजन, लेखापाल दिपक महाजन,शोभना महाजन, ज्युडिशीयन धर्मदाय आयुक्त, वैशाली महाजन नगरसेविका, आदि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला अध्यक्ष प्रकाश महाजन व भिकन महाजन महात्मा फुले बहु.संस्था यांनी आयोजन केले. या वेळी 10 वी व 12 वी च्या ज्या विद्यार्थ्यांनी 70 % गुण मिळवले त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र लाईव्ह चे मुख्यसंपादक चेतन महाजन यांनी कमी वयात पत्रकारीतेत नावलौकीक मिळवले त्यानिमीत्त त्यांचाही सत्कार करण्तात आला.या सोहळ्यास किरण टी हाऊस, हरिओम टाईल्स,यश डेअरी,ओम बुक डेपो, आकार कन्ट्रक्शन यांचे अनमोल सहकार्य लाभले. यासोहळ्यास मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रचे सूत्रसंचालन प्राध्यापक रोकडे सर यांनी केले तर आभार प्रविण महाजन यांनी मांडले. समाजातील नामवंत पदाधिकारी व मोठ्या संखेंने माळी समाज उपस्थित होता.