Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

najarkaid by najarkaid
November 5, 2022
in जळगाव
0
श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच.. लाल मखमली पडदा.. पार्श्वसंगीताचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग.. तिसरी घंटा.. आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी समोर बसलेले प्रेक्षक, हे वातावरण डोळ्यासमोर येताच कोणत्याही रंगकर्मींच्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. कलावंतांना या प्रयोगातून मिळणाऱ्या प्रोत्साहनातून त्यांच्यातील अभिनेता वा अभिनेत्री घडत जाते. कलावंतांनी रंगभूमीची सेवा सुरु करण्याचा प्रथम दिवस म्हणून दरवर्षी ५ नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो.

मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी ५ नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा असतो. ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये सांगली येथे  चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग सादर करुन मराठी रंगभूमीचा पाया रचला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.

जळगाव शहरालासुध्दा सांस्कृतिक वलय असून, बालगंधर्वांची प्रथम कर्मभूमी म्हणून जळगाव ओळखले जाते. त्यामुळे रंगभूमी दिनाच्या दिवशी नटेश्वर व रंगभूमीसोबतच बालगंधर्वांचे स्मरण जळगावकर कलावंतांनी करणे ओघाने येते. दरवर्षाप्रमाणे यंदाही बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हातर्फे शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात रंगभूमी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पियुष रावळ यांच्याहस्ते नटेश्वर व रंगमंचाचे पूजन करण्यात आले. संस्कारभारतीचे सांस्कृतिक विभागप्रमुख दुष्यंत जोशी यांनी नांदी म्हटली. याप्रसंगी चिंतामण पाटील यांनी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य व महत्व उपस्थितांसमोर विषद केले.

कार्यक्रमाला जळगावातील ज्येष्ठ रंगकर्मी अरुण सानप, नितीन देशमुख, संजय पांडे यांच्यासह प्रा.राजेंद्र देशमुख, योगेश शुक्ल, विनोद ढगे, सचिन महाजन, प्रविण पांडे, सुभाष मराठे, ॲड.पद्मनाभ देशपांडे, हनुमान सुरवसे, दिपक महाजन, अमोल ठाकूर, दुर्गेश आंबेकर, नेहा वंदना सुनिल, राहुल वंदना सुनिल, आकाश बाविस्कर, बंडू दलाल, अरविंद पाटील, एस.एस.पाटील यांच्यासह कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगावच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news ; एरंडोलमध्ये ३२ वीजचोरांवर धडक कारवाईने खळबळ !

Next Post

राज्यभरातले अनेक नेते भाजपाच्या मार्गावर ; गिरीश महाजनांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

राज्यभरातले अनेक नेते भाजपाच्या मार्गावर ; गिरीश महाजनांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us