Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रद्धेच्या आडून फसवणूक आणि खोटेपणा अशा संकल्पनेवर आधारित स्पॅनिश थरारपट ‘द प्रिचर’

najarkaid by najarkaid
November 25, 2021
in Uncategorized
0
श्रद्धेच्या आडून फसवणूक आणि खोटेपणा अशा संकल्पनेवर आधारित स्पॅनिश थरारपट ‘द प्रिचर’
ADVERTISEMENT

Spread the love

द प्रिचर’ हा एक स्पॅनिश रहस्यमय थरारपट असून भोळ्या, पापभिरू लोकांची श्रद्धेच्या नावाखाली नियोजनबद्ध फसवणूक करणाऱ्या टोळीच्या कारस्थानांची कथा यात आहे. जिथे श्रद्धेचा बाजार मांडत भ्रष्टाचार आणि फसवणूक बेमालूमपणे केली जाते अशा शहरातील कारस्थाने आणि धर्मांधता यांचे चित्रण असलेली ही कथा आहे.

“या चित्रपटाच्या माध्यमातून,माझा हेतू अशा विषयाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा होता, जो जगात सगळीकडे घडतो आहे, अशी माहिती, ‘द प्रिचर’ चे दिग्दर्शक टिटो जारा यांनी दिली. गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफफीदरम्यान प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला चित्रपटाचे निर्माते मगदा ग्रेस देखील उपलब्ध होते.

“मी स्वतः सश्रद्ध व्यक्ती आहे, त्यामुळे माझा चित्रपट कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. मात्र श्रद्धावान लोक जेव्हा अडचणीत असतात, त्यावेळी ही श्रद्धाच त्यांची शेवटची आशा असते, आपल्याला संकटातून बाहेर काढणारा काही चमत्कार होईल अशी आस त्यांना असते. अशा भोळ्या लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा गैरफायदा घेणाऱ्या काही दुष्टप्रवृत्ती असतात, त्यांच्यावर माझा सिनेमा कठोर प्रहार करतो.” असे दिग्दर्शक म्हणाले.

धर्म हा असा विषय आहे, ज्यावर काहीही बोलले तर लगेचच भावना दुखावल्या जातात, आक्षेप घेतले जातात.” मात्र आम्हाला काहीही विवाद निर्माण करण्यात रस नाही. धर्माच्या नावाखाली गैरफायदा घेणाऱ्या लोकांविरोधात माझा चित्रपट आहे.”

“धर्माबाबत लोक संवेदनशील असतात, याची मला जाणीव आहे. मात्र तरीही आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो, असा मला विश्वास वाटतो” असेही जारा पुढे म्हणाले.

हा चित्रपट वास्तव घटनांवर आधारित आहे. यात एका छोट्या मुलीची कथा आहे. या मुलीकडे कोणतेही आजार स्पर्शाने बरे करण्याची आणि त्रस्त मनांना दिलासा देण्याची ‘दैवी शक्ती’ आहे असा अपप्रचार करुन एक बदमाश तिचा वापर करुन घेतो.

“हा चित्रपट तयार करण्यासाठी मला 9 वर्षे लागलीत. याकाळात मी अशा अनेक ‘कथित चमत्कार करणाऱ्या’ आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना भेटलो. माझ्या देशात जे काही घडते आहे, त्याचाच लेखाजोखा मी या चित्रपटात मांडला आहे, असेही जारा यांनी सांगितले.

Spread the love
Tags: द प्रिचर the prichar
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात ट्रॅक्टरची चारचाकी वाहनाला धडक ; २ जण जागीच ठार

Next Post

संविधान जागर रॅलीत सहभागी होण्याचा निर्धार

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
संविधान जागर रॅलीत सहभागी होण्याचा निर्धार

संविधान जागर रॅलीत सहभागी होण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us