जळगाव – जलसंपदा विभागांतर्गत तापी विकास महामंडळ क्र. ४ अंतर्गत शेळगाव, ता. जळगाव येथे शेळगाव बॅरेज प्रकल्प उभारणीचे कार्य गेल्या १२ वर्षापासून सुरु आहे.
धिम्या गतीने होणाऱ्या या प्रकल्पास येथील पुरातन मठाधिपती ‘भृगू ॠषी’ यांचे नामकरन करुन भृगू सागर करण्यात यावे अशी मागणी भादली बु॥, शेळगाव, कलगाव, कानसवादा, आसोदा तरसोद, नशिराबाद, भालशिव, ताकरखेडा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांना ग्रामस्थांनी निवेदन देखील सदर केले आहे. जळगाव, यावल, भुसावळ तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या शेळगाव बॅरेजमुळे सिंचन क्षमता वाढणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला निधी प्राप्त करुन देत प्रकल्प त्वरीत पुर्न करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निवेदनावर हभप गोपाळ ढाके, ॲड. राधिका ढाके, जागृती चौधरी, मिलींद चौधरी, यांच्या स्वक्षऱ्या आहेत.















