जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी विभागाने जिल्हास्तरावरून नियंत्रण कक्ष स्थापन केला असून शेतकऱ्यांना या कक्षातील भ्रमणध्वनीवर सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क करून आपली अडचण दूर करता येणारं आहे.
सविस्तर असे की,जिल्हयात खरीप हंगाम २०२४ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याचा अनुषंगाने येणा-या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येत असुन सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९८३४६८४६२० तसेच कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर सुध्दा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रारsaojalgaon@gmail.com वर सुध्दा ईमेल व्दारे पाठवता / नोंदवता येईल.जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबधी तक्रार निवारण कक्षात खालील प्रमाणे अधिकारी/कर्मचारी कार्यरत राहील.
या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे करू शकता तक्रार
विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांवमोबाईल क्र.९८३४६८४६२०
संतोष भावसार,वरिष्ठ लिपीक -९८३४६८४६२०
समाधान देवरे, कषि सहाय्यक -९८३४६८४६२०









