Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांवार लाठी चालवीणाऱ्यांना जनता धडा शिकविणार – शरद पवार

najarkaid by najarkaid
September 6, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांवार लाठी चालवीणाऱ्यांना जनता धडा शिकविणार – शरद पवार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात शांततेने उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठी चालवीणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता सत्तेवर ठेवणार नाही, संधी मिळेल तेव्हा त्यांचा पराभव करतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जळगाव येथीलजाहीर ‘स्वाभिमान सभेत’  बोलताना व्यक्त केले.शहरातील सागरपार्क मैदानावर शरद पवार यांची स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती.सभेला प्रचंड गर्दी उसळली होती.

 यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, संतोष चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की देशातील आणि राज्यातील सरकारला शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था नाही. कांदा, कापूस  भावाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकरी हा भीक मागत नाही तर आपल्या घामाची किंमत मागतो आहे.मात्र हे सरकार तेव्हढेही त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे देशातील आणि राज्यातील सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिली आहे, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

देशातील सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून शरद पवार म्हणाले, की सत्तेचा उपयोग जनतेसाठी करायाचा असतो, परंतु सध्याचे सरकार सत्तेचा वापर ईडी व सीबीआयच्या कारवाया विरोधकांवर करण्यासाठी वापरत आहेत. नवाब मलीक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. सद्यःस्थितीत सत्तेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथे गेले होते. त्या वेळी जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खरंच चुकीचे काम केले असेल तर त्याची सखोल चौकशी करा; परंतु जर खोटं निघाल तर पंतप्रधान काय शिक्षा घेणार, हेही त्यांनी सांगावा. पंतप्रधानांनी खोटे आरोप करावे ही जनतेच्या हिताचे नाही, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीकडून एकनाथराव खडसे लोकसभा २०२४ चे उमेदवार ?

Next Post

नको त्या अवस्थेत आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले ; पोटच्या मुलाला आईनेच ठार मारले

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
नको त्या अवस्थेत आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले ; पोटच्या मुलाला आईनेच ठार मारले

नको त्या अवस्थेत आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले ; पोटच्या मुलाला आईनेच ठार मारले

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us