Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

najarkaid live by najarkaid live
November 2, 2020
in जळगाव
0
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार  – गृहमंत्री अनिल देशमुख
ADVERTISEMENT

Spread the love

      जळगाव, – बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अमळनेर येथे केले.

          अमळनेर येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन व एरंडोल येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह अमळनेरच्या नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजीमंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, दिलीप वाघ, रवींद्र भैय्या पाटील, हाजी गफ्फार मलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी गृहमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. बळीराजाच्या हिताला राज्य शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदा आणण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे एस आर पी एफ च्या बटालियन चे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखणे, दोषींवर कारवाई करुन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर कायदा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने राज्यातील पोलीसांच्या वसाहतींसाठी पहिल्या टप्प्यातच 750 कोटी रुपयांची तरतूद केली असून, राज्यातील पोलिस वसाहतींच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देऊन या वसाहती गतीने पूर्ण करणार असून जळगाव जिल्ह्यातील पोलीसांचे व पोलीस दलाचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस वसाहतींना प्राधान्याने पाणीपुरवठा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असतात, त्यामुळे पोलिसांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. पोलिसांच्या वसाहतींना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलिसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असून जळगाव जिल्हा कारागृहाची क्षमता वाढवावी, जळगाव कारागृह नवीन जागेत स्थलांतरित करावे, त्याचबरोबर भुसावळ येथे वर्ग-1 जिल्हा कारागृहास मंजुरी मिळावी. तसेच जिल्ह्यातील भौगोलीक परिस्थिती व पोलीस स्टेशनमधील गावांची संख्या लक्षात घेता पाळधी व म्हसावद येथे नव्याने पोलीस स्टेशनची निर्मिती करणे, चोपडा, यावल, फैजपूर येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामास मंजुरी मिळण्याची मागणीही त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांकडे केली.

प्रत्येक सासुरवासिणीला पोलीस स्टेशन हे माहेर वाटले पाहिजे – प्रताप दिघावकर

          शासन पोलिसांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत आहे अशावेळी पोलिसांनीही प्रत्येक नागरिकाला चांगली वागणूक दिली पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक भगिनीला (सासुरवासिणीला) पोलिस स्टेशन हे तीचे माहेर आहे असे वाटले पाहिजे. पिडीत, गोरगरीब, शेतकरी यांना न्याय देण्याची भूमिका पोलिसांनी निभावली पाहिजे असे सांगून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ प्रतापराव दिघावकर म्हणाले की, नाशिक येथील पदाचा कार्यभार घेतल्यापासून सन 2013 पासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पाच कोटी रुपये मिळवून दिले असून अजून 661 व्यापारी बुडविलेले पैसे परत देणार आहे. त्याचबरोबर अमळनेर पोलीस स्टेशन हे शहराच्या बाहेर असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील पोलीस चौकीतच एफआयआर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. दिघावकर यांनी यावेळी सांगितले,

          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले की, पोलिसांचा महत्त्वाचा विषय आज मार्गी लागत आहे, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची निवासस्थाने उपलब्ध झाल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी अधिक जोमाने व उत्साहाने काम करतील अशी ग्वाही देऊन त्यांनी जिल्ह्यातील पोलीसांचे व पोलीस दलाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव व पोलीस निरिक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी तर उपस्थितांचे आभार अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी मानले. या कार्यक्रमास पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसेंमुळे राष्ट्रवादी पक्षाला बळ मिळणार – गृहमंत्री ना.अनिल देशमुख

Next Post

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज ५४ वा वाढदिवस…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज ५४ वा वाढदिवस…

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज ५४ वा वाढदिवस...

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us