Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना एनडीएतून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब

najarkaid by najarkaid
November 17, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
शिवसेना एनडीएतून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजपसोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.

महाराष्ट्रात सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा यावरून भाजप-शिवसेना युतीत बिनसलं. शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससह राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चा देखील सुरू झाली आहे. दुसरीकडे, मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनीही गेल्या सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. ‘अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं ते एकप्रकारे एनडीएतूनच बाहेर पडले आहेत. सहाजिकच, त्यांना लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बाकावर बसवले जाईल, असं ते म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या राज्यसभेतील तिन्ही सदस्यांना विरोधी पक्षाची आसने देण्यात आली आहेत. लोकसभेत आसन व्यवस्था वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

शिवसेनेच्या दोन्ही सदनातील खासदारांना सत्तापक्षाची जागा देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं आणि शिवसेना जवळजवळ एनडीएतून बाहेर पडल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, त्याबाबत भाजप किंवा शिवसेनेच्या नेत्यांनीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. संसदेत बसण्याची जागा बदलली असल्याची माहिती मिळाल्याचं संजय राऊत यांनीही सांगितलं होतं. शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं ते म्हणाले होते. मात्र, आता भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यांची व्यवस्था विरोधी पक्षात केली आहे,’ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिदंबरम यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

Next Post

मी पुन्हा येईन’; शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
Next Post
मी पुन्हा येईन’; शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

मी पुन्हा येईन'; शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us