पाचोरा – केन्द्रात सीबीएसई बोर्डाकडून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या ईयत्ता 10 वीच्या परिक्षेत शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले .
शिंदे इंटरनॅशनल स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेत प्रविष्ट झालेले सर्व 27 विद्यार्थी उच्च गुणवत्ता प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत.विशेष म्हणजे शिंदे विद्यालयातून प्रथम आलेली कु.आर्या दीपकसिंग पाटील हिने पाचोरा केंद्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
विद्यालयातील सर्वाधिक गुण संपादन करणारे पहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे-
1. कु. आर्या दिपकसिंग पाटील (९६.२%)- प्रथम
2. कु. ज्योतिरादित्य राहुल पाटिल (९५.२%)-द्वितीय
3. कु. भावेश वासुदेव अहिरे ( १३.८%)-तृतीय
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडीतराव शिंदे, उपाध्यक्ष निरजभाऊ मुणोत, सह सचिव शिवाजी शिंदे सर व शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना परिश्रमपूर्वक अध्यापन करणाऱ्या शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.