https://youtube.com/shorts/FnAvlR29yyM?si=Qf1CI6sHfDlj3KX1
व्हिआयपी नवाब नावाने इन्स्टा रील गर्ल काजलनं जन्मदात्या आईसह भावाचा केला खून केला. दोघांना यमसदनी पाठवल्यावर घरातील रोख चौदा लाख रुपये घेऊन बाईक वर ब्युटीपार्लर पण गेली, आई, भावाला संपवल्याचा कुठलाच मनस्ताप तीला नसून एकुलत्या एक मुलीनं इतकं मोठं षडयंत्र रचलं आणि कुटुंब उद्धवस्त केलं यावर लोकांना विश्वास बसत नाही.दरम्यान ती समलैंगिग असल्याची माहिती आहे. भावाच्या बायको सोबत तीचे समलैंगिक संबंध होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.सदर घटना हरियाणाच्या यमुना नगर भागात घडली आहे. या घटनेला ७२ तास उलटल्यानंतर आरोपी काजलबाबत तिच्या मावशीनं हैराण करणारा खुलासा केल्याने खळबळ उडाली.
https://youtube.com/shorts/ApWJSoMX8Zs?si=YDaLOQRXsQTMUFpl
काजल समलैंगिक
२७ वर्षीय काजल एक समलैंगिक मुलगी होती, काजलच्या भावाचे २ लग्न झाले होते. राहुलचं पहिलं लग्न काजलनेच तिच्या एका मैत्रिणीसोबत केले होते. लग्नानंतर काजल तिच्या मैत्रिणी असलेल्या वहिनीला रात्री तिच्या खोलीत बोलावत समलैंगिग संबंध प्रस्थापित करत होती ही बाब उघड होताच राहुल आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. त्यानंतर राहुल आणि त्याची पत्नी वेगळे झाले.घरच्यांनी काजलला खूप समजण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
काही काळानंतर राहुलने दुसरं लग्न केले. घरात नवीन सून आली तिचे काजलसोबत सतत वाद होत होते. त्यामुळे काही दिवसांनी ती माहेरी निघून गेली. या सर्व गोष्टीवरून काजलचं तिच्या आईशी आणि भावाशी वाद व्हायचे. परंतु तिच्या मनात इतका राग असेल ज्यातून काजलने इतकं मोठं षडयंत्र आणि गंभीर पाऊल उचलेल याची भनकही कुणाला नव्हती.
खून करून ब्यूटी पार्लरला गेली काजल
काजलला आई आणि भावाला मारल्याचा कुठलाही पश्चाताप नाही. हत्याकांडानंतर काजल घरात ठेवलेले १४ लाख रुपयांचे दागिने घेऊन बाहेर पडली. ती परिसरात फिरत होती. त्यानंतर ब्यूटी पार्लरलाही गेली.
VIP नवाब नावानं इन्स्टाग्रामवर अकाऊंट
एका मोबाईल शॉपवर सेल्सगर्ल म्हणून काम करते.काजल व्हिआयपी नवाब नावाने इन्स्टा अकाऊंट चालवायची, त्यावर रिल्स बनवून शेअर करायची.दरम्यान, काजलसोबत मिळून संपत्तीच्या लालसेपोटी आत्या आणि भावाच्या हत्याकांडात सहभागी कृष हादेखील सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.