Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विसर्जनस्थळी मेहरुण तलाव परिसरावर राहणार ‘ड्रोनची नजर’

विसर्जनस्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राहणार सज्ज ; वन्यजीव संरक्षण संस्थेचे जीवरक्षक आणि सर्पमित्र पथकही तैनात

najarkaid by najarkaid
September 18, 2021
in जळगाव
0
विसर्जनस्थळी मेहरुण तलाव परिसरावर राहणार ‘ड्रोनची नजर’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 18 – सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, याठिकाणी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव सज्ज झाला असून वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आणि जीवरक्षक शोध व बचाव पथक तसेच निर्माल्य संकलनासाठी श्री सेवकासह 40 जणांचे पथक मेहरुण तलाव परिसरात सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांच्या नेतृत्वात रविवार, 19 सप्टेंबर रोजी पूर्णवेळ हे पथक कार्यरत राहणार आहे. या शोध व बचाव पथकास जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बोट उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात 10 पट्टीचे पोहणारे प्रशिक्षित जीवरक्षक तैनात राहणार आहेत. तर अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरावर सतत नजर ठेवून असणार आहेत. असे संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, बाळकृष्ण देवरे यांनी कळविले आहे.

मेहरूण तलावात श्रींच्या विसर्जन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, या अनुषंगाने दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शोध व बचाव पथक तैनात केले जाते. त्यानुसार यावर्षीही हे पथक तैनात राहील. याचबरोबर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तही तैनात राहणार आहेत.

असे राहील नियोजन

जीवरक्षक पथक :-

नरवीर सिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, योगेश गालफाडे, ऋषी राजपूत, शीतल शिरसाळे, अजीम काझी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, सतीश कांबळे, रितेश भोई, चेतन भावसार, रवींद्र फालक तसेच मनपा अग्निशमन विभाग जीवरक्षक पथक देखील तैनात राहणार आहेत. हे सर्व जीवरक्षक सकाळपासून रात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत बोट घेऊन मेहरुण तलावात गस्त घालून नागरिकांना सूचना देतील.

या परिसरात साप, विंचू यांचा अधिवास असल्याने अचानक सर्प दृष्टीस पडल्यास नागरिक घाबरून धावपळ करतात, यावर पर्याय म्हणुन वन्यजीव संरक्षण संस्थेचे 10 सर्पमित्रही याठिकाणी तैनात राहणार आहे.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 7709776446/ 9028308365 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

सर्पमित्र पथक

जगदीश बैरागी, अभिषेक ठाकूर, सुरेंद्र नारखेडे, निलेश ढाके, शुभम पवार, दुर्गेश आंबेकर, दिनेश कोळी, बापू कोळी, किरण सपकाळे, वासुदेव वाढे, गणेश सोनवणे हे राहतील.

निर्माल्य संकलन श्री सेवक

तलावात निर्माल्य जाऊ नये तसेच लहान मुले काठावर जाऊ नये, यासाठी 20 जणांचे पथक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात निर्माल्य संकलनासाठी तैनात राहणार आहे. नागरिकांनी निर्माल्य या पथकाकडे जमा करावे.

या पथकात प्रसाद सोनवणे, अरुण सपकाळे, जितेंद्र सोनवणे, भूषण चौधरी, गणेश सपकाळे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, रवींद्र भोई, ललित शिरसाठे, तुषार रंध्ये, भुपेंद्र तळेले, गौरव शिंदे आदि सहभागी राहतील असे श्री. रावल यांनी कळविले आहे.

000000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेच्या खाजगीकरणला ‘सीआरएमएस’ चा विरोध

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना मंजुर झालेली रक्कम त्वरित वितरित करा

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना मंजुर झालेली रक्कम त्वरित वितरित करा

जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना मंजुर झालेली रक्कम त्वरित वितरित करा

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us