Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विविध उपक्रमांनी “उमंग” मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

najarkaid by najarkaid
March 9, 2020
in जळगाव
0
विविध उपक्रमांनी “उमंग” मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खासदार उन्मेशदादा पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका  संपदा पाटील यांच्या वतीने आज सकाळी साडे पाच वाजता राष्ट्रीय महाविद्यालयाच्या प्रांगणातुन नाशिक महिला मॅरेथॉनच्या संस्थापिका सोनाली दबक , उद्योजिका डॉ कविता बोंडे यांच्या  उपस्थितीत “महिला मॅरेथॉनला” हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.यावेळी जेष्ठ रंग कर्मी सुनीता घाटे,पोद्दार शाळेच्या प्राचार्या लता उपाध्याय, मुख्याध्यापिका सुनीता देवरे ,नगरसेविका विजया भिकन पवार, माजी सभापती स्मितल बोरसे, दिव्यांगाच्या आधारस्तंभ मीनाक्षी निकम ,हिरकणी मंडळाच्या सुचित्रा राजपूत, जिजाऊ समिती अध्यक्षा सोनल साळुंखे,हेमलता शर्मा ,उमंग संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील ,अध्यक्षा सुवर्णा राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविकातून संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी सहभागी महिला संघटना व महिला मंडळ पदाधिकारी यांचे स्वागत केले व मान्यवरांचा सत्कार केला.

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहर दणाणले.

आज सकाळी जवळपास चारशे महिला मुलींच्या उपस्थित मॅरेथॉन स्पर्धेला राष्ट्रीय महाविद्यालय येथून सुरू झाली. येथून सिग्नल पॉइण्ट लकी बूट हाऊस समोरील गणेश क्रॉस रोड बस स्थानक रोड तेथून पुन्हा सिग्नल चौकातून राष्ट्रीय महाविद्यालय येथे  मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप झाला.या स्पर्धेत मुली आणि महिला अशा दोन गटातून प्रत्येकी तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.सुरुवातीला प्रास्तविकातून संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी सहभागी महिला संघटना व महिला मंडळ पदाधिकारी यांचे स्वागत केले.सोनाली दबक,डॉ. कविता बोंडे, कराटे ट्रेनर फिरोज खान या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुलींच्या गटातील विजेत्या  राजश्री पाटील, खुशी घुले, मंजुषा पाटील तसेच महिलांच्या गटात मालती बच्छे, अर्चना येवले, डॉ. चंचल बडगुजर यांना मान्यवरांच्या हस्ते जि वाय एम फिटनेस क्लबची वार्षिक सदस्यता बहाल करण्यात आली.चारशे महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहर दणाणले

स्त्री जागर कार्यक्रम रंगला

स्त्री जागर कार्यक्रमाच्या आरंभी ऍड.भारती सोनवणे यांनी नृत्य कला सादरीकरण केले.आंतरराष्ट्रीय कराटे  प्रशिक्षक  फिरोज खान यांनी उपस्थित महिलांना स्व- संरक्षणाचे धडे दिले.तर नाशिक वाकेथॉन च्या संस्थापिका सोनाली  दबक यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा आग्रह करीत मी फिट तर माझी फॅमिली फिट हा कानमंत्र दिला. महिला  मानसिक ,शारीरिक सदृढ राहिली तर तीचा परिवार अधिक निरोगी राहील.महिलांनी नियमित व्यायाम करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यानंतर डॉ कविता बोंडे यांनी लघु उद्योगातून रोजगाराबद्दल मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या महिला ही अन्नपूर्णा आहे ती दररोज  घरच्यांसाठी स्वयंपाक करते हाच स्वयंपाक वाढवून महिलांनी पोळी भाजी केंद्र सुरू करावे.कोणताही व्यवसाय करतांना हिंमत ठेवावी किमान शंभर दिवस उद्योगाची कसोटी असते.यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली.

विविध महिला संघटनांचा सक्रिय सहभाग 

“चला आत्मबळासाठी धावू या” तसेच “स्त्री शक्तीत नवी उमंग जागवूया”  या उपक्रमात महिला मॅरेथॉन व स्त्री शक्ती जागर या दोन्ही कार्यक्रमांत शिंपी समाज महिला मंडळ, लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ, मारवाडी समाज महिला मंडळ, ब्राम्हण समाज महिला मंडळ, राणी पद्मावती राजपूत महिला मंडळ, संस्कार भारती ,वसुंधरा फाउंडेशन ,आई फाउंडेशन,इनरव्हील क्लब ऑफ मिल्कसिटी,रंगगंध कला सक्त न्यास तसेच रोटरी क्लब या सर्व विविध संस्थाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्या पिवळा पोशाख परिधान करून सहभागी  झाल्या होत्या . सहभागी  महिलांना पन्नास टक्के सवलतीत  जि वाय एम फिटनेस क्लबची मेंबरशीप देण्यात आली . तर विजेत्यांस एका वर्षाची मेंबरशीप गिफ्ट हॅपर ,मेडल देऊन गौरवविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या मोठी मेहनत घेतली. अतिशय नीटनेटके आयोजनामुळे महिलांनीआनंद व्यक्त केला.आभार विजया पाटील यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2019 कार्यक्रम रद्द

Next Post

राज्यसभेसाठी पवार-राऊतांची खलबतं; काँग्रेसचीही लॉबिंग

Related Posts

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
Next Post
राज्यसभेसाठी पवार-राऊतांची खलबतं; काँग्रेसचीही लॉबिंग

राज्यसभेसाठी पवार-राऊतांची खलबतं; काँग्रेसचीही लॉबिंग

ताज्या बातम्या

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us