रावेर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील विवरे बुद्रुक जि.प.उर्दू शाळेत लॉकडाऊनचा गैरफायदा उचलत तळीराम धुमाकूळ घालतांना दिसत आहे.
एकीकडे कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. तर दुसरीकडे दारू पिणाऱ्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
गावातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेला सुट्या लागल्या असल्याने व लॉकडाउनचा गैरफायदा घेत रात्री दारू पिणारे शाळेत मैफिल भरवीत आहे. यामुळे सोशल डिस्टन्ससिंग चा फज्जा उडत आहे तर दारू पिऊन झाल्यावर मद्यपी शाळेचे नुकसान देखील करत आहे तरी प्रशासनाने या तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक करित आहे.