नवी दिल्ली : जे विद्यार्थी हुशार आहेत, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सरकार आर्थिक लाभ देते. गरजू मुलांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये. या शिष्यवृत्ती योजनांपैकी एक पीएम शिष्यवृत्ती योजना आहे.
यावेळी अर्ज प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पदवीच्या अभ्यासासाठी दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल.
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करता यावी यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली होती.
खूप मदत
शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना २५०० रुपये आणि मुलींना ३००० रुपये प्रति महिना दिले जातात.
या तारखेपर्यंत अर्ज करा
विद्यार्थी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2023 साठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
जाणून घ्या काय आहे पीएम शिष्यवृत्ती योजना
पीएम शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना वार्षिक 36,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते
हे पण वाचा..
प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूड हादरले
सर्वसामान्यांना पुन्हा झटका ! राज्यात पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी महाग, नवीन दर जाणून घ्या
अवकाळीमुळे शेतीचे मोठं नुकसान; जळगावात किती नुकसान? सभागृहात उपमुख्यमंत्री दिली ‘ही’ माहिती
या शिष्यवृत्तीसाठी पात्रता
यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीत किमान ६० टक्के गुण असावेत. यापेक्षा कमी गुण मिळाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
कोण अर्ज करू शकतो
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी, आसाम रायफल्स, आरपीएफ आणि आरपीएसएफ जवानांची मुले अर्ज करू शकतात.
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची मुले या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात अपंग झालेल्या जवानांची मुलेही अर्ज करू शकतात.
















