जळगाव;- राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत विविध गटात प्रथम व व्दितीय पारितोषिक प्राप्त केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 5 विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर आणि पदवी-पदव्युत्तर अशा तीन गटांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांना प्रथम व व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या पाचही विद्याथ्र्यांची राज्यपालांकडून शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाज्या विद्याथ्र्यांना 10 महिन्यांसाठी दरमहा तीनहजार रुपये तर पीएच.डी करणाज्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी दरमहा सहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सुरु ठेवणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रगती अहवाल विद्यापीठाला द्यावा लागेल.
मानव्य विद्या, भाषा व ललितकला गटातील पदवी गटातून मनिषा चौधरी या विद्यार्थिनीने महिलांसाठी संरक्षण बाटली तयार केली आहे. या प्रयोगाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. यामध्ये कटर, टॉर्च, जीपीएस करंट बटण, तात्काळ संदेश यंत्रणा, मिरचीचा स्प्रे, पिण्याचे पाणी अशा काही गोष्टींचा समावेश बाटलीमध्ये आहे. त्यासाठीचे पेटंट फाईल करण्यात आले आहे. पीएच.डी गटात मानव्य विद्या, भाषा यामधून स्वाती तायडे या विद्यार्थिनीला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला होता. या संशोधनात माध्यमिक स्तरावर विज्ञान अध्यापनासाठी स्वनिर्मित शौक्षणिक साहित्य व त्याचा परीणामकारकतेचा अभ्यास या विषयाच्या अनुषंगोन टाकाऊ पासून टिकाऊ असे विज्ञान अध्यापनासाठी प्रतिकृती तयार केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विषयाच्या पीएच.डी गटात विभा पाटील या विद्यार्थिंनीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तिने संशोधनात अॅग्रा आऊट सोर्सिंग सेंटर हा प्रकल्प शेतकज्यांसाठी विकसित केला असून ज्यांना शेती उपकरणे भाडे तत्त्वावर घ्यावे लागतात अशा शेतकज्यांसाठी प्रत्येक ऋतूप्रमाणे उपकरणे उपलब्ध करुन दिली जाऊ शकतात असे सिध्द केले आहे. विज्ञान विषयाच्या पदव्युत्तर गटात मोहम्मद शाहरुख एस. एच. शाह या विद्याथ्र्यांने व्दितीय पारितोषिक प्राप्त केले. त्याने संशोधनात प्रोबायोटीक जीवाणू पासून कॅल्शियम फॉस्फेट न्ॉनोपार्टीकल निर्मिती मानवाच्या शरीरात असलेल्या लाभदायक सुक्ष्म जीवाणूंपासून कॅल्शियम फॉस्फेट न्ॉनोपार्टीकल निर्मिती करतात की जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात असे सिध्द केले आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाच्या पदव्युत्तर गटात शुभम पाटील या विद्याथ्र्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने आपल्या संशोधनात कर्णबधीर व्यक्तींसाठी दातांमार्फत ऐकू येणारे श्रवणयंत्र मोबाईल अॅप व कंपन तयार करणाज्या दोन मायक्रोचिप दातावर बसविल्या आहेत व दातांमार्फत सिग्नल व संवेदना मेंदूला पोहचतात. हा प्रयोग 128 जणांवर यशस्वी झाला आहे.
वरील पाचही विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती जाहिर झाल्याबददल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील, विद्यार्थी विकास संचालक प्रा.सत्यजित साळवे अविष्कारचे समन्वयक प्रा.भूषण चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.