Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात करण्याआधी त्रुटींची माहिती घ्यावी: प्रा.धिरज पाटील..

najarkaid live by najarkaid live
July 10, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ ;- केंद्र सरकारनं विजेसंदर्भात नवं धोरण तयार केलं आहे. या धोरणातल्या नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट ग्राहकाच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार आहे. केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयानं हे धोरण तयार केलं आहे. या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत मिळणार आहे ही बाब चांगली असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याआधी ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करावा अशी मागणी भुसावळ शिवसेनेतर्फे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी  राज कुमार सिंग, केंद्रीय राज्यमंत्री शक्ती मंत्रालय यांच्याकडे केली आहे.
स्मार्ट मीटरची संकल्पना असतांना आर.एफ. मीटर का लावले?
तसेच ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही. तसेच वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून वीजपुरवठ्याअतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनदरम्यान  वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रक्रियेलाही ग्राहकांच्या खात्याशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ पुरवठा केलेल्या विजेचेच पैसे वसूल करता येणार आहे तसेच कधी कधी घराच्या बाहेर असताना अचानक लक्षात येते की, घरातील लाईट, टीव्ही किंवा अन्य दुसरे विजेचे उपकरण अॅपच्या माध्यमातून बंद करता येणार आहे. हे स्मार्ट मीटरमुळे शक्य होणार आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवले जाईल. या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचेल. विजेचे आॅडिट करता येईल. वीज चोरीची माहिती तात्काळ मिळू शकेल. मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो परंतु आताच भुसावळ परिसरात नवीन गतीने फिरणारे आर.एफ. मीटर बसवले गेले आहेत ज्याच्या विरोधात हजारो तक्रारींचा पाऊस वीज वितरण कार्यालयात पडला. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन उच्च स्तरीय समिती नेमून निर्णय द्यावा, ग्राहकाला पुन्हा एकदा “नवीन स्मार्ट मीटर”चा नाहक त्रास होता कामा नये अशी मागणी केली आहे.
सबसिडी जमा होण्यामध्ये लाखो अडचणी:
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचे रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतांना लाखो अडचणी येतात. त्यापैकी एक मुख्य उदाहरण शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, आजही त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. तसेच वीज ग्राहकांच्या नावावर असलेल्या खात्यात रक्कम जमा होईल म्हणजे ज्याच्या नावाचे बिल आहे, त्याचे खाते आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी भाडेकरू हे ग्राहक असतात मग सबसिडी प्रत्येक वेळेस घर सोडून गेलेल्या भाडेकरूंच्या नावावर जमा होईल. काही ग्राहक मयत झालेले असून त्यांच्या नावारील सबसिडी कोठे जाईल? या अश्या असंख्य तक्रारीचा सामना ग्राहकालाच करावा लागणार आहे.
निवडणूक आयोगातर्फे मतदारांची जागेवर जाऊन माहिती घेतली जाते त्याप्रमाणे नावे कमी करणे किंवा दुरुस्ती करणे केले जातात. तशीच विज ग्राहकांची जागेवर माहिती घेतली जावी आणि आवश्यक तेथे दुरुस्ती करून घ्यावी मगच अनुदान देण्यासाठी तरतूद करावी अशी प्रा. पाटील यांनी मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यापीठाच्या ५ विद्यार्थ्यांची राज्यपाल शिष्यवृत्तीसाठी निवड 

Next Post

मनुदेवीचा धबधबा ओसंडून वाहू लागला 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

मनुदेवीचा धबधबा ओसंडून वाहू लागला 

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us