Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजयी माळ रोहिणीताईंच्याच गळ्यात पडेल – माणिकराव  पाटील

najarkaid by najarkaid
October 17, 2019
in जळगाव, राजकारण
0
विजयी माळ रोहिणीताईंच्याच गळ्यात पडेल – माणिकराव  पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्‍ताईनगर – महाराष्ट्राचे लोकनेते आ एकनाथराव खडसे जाती पातीच्या राजकारणाला थारा  न देता  गेल्या तीस वर्षापासून मुक्ताईनगर मतदारसंघांचे नेतृत्व करत आहेत.  स्वातंत्र्यापासून खऱ्या अर्थाने मागास राहिलेल्या  मतदार संघात त्यांनी रस्ते, भव्य  पूल , शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या, पिण्याचे पाणी, घरकुले,  गावागावात समाज मंदिरे, बौद्ध विहार , पूर्णत्वाकडे असलेल्या वढोदा उपसा सिंचन  व बोदवड उपसा सिंचन योजना आणून जणू विकासगंगाच मतदारसंघात आणून जनसामान्य नागरिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे, याचा फायदा या निवडणूकित सौ रोहिणीताईना निश्चितपणे  होणार असून  मतदारसंघातील सुज्ञ मतदाता भाजपा महायुती च्या उमेदवार सौ रोहिणीताईंनाच्याच गळ्यात विजयी माळ घालतील, त्यामुळेच दि 21रोजी त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी आपले अमूल्य मत देण्यासाठी कमळ निशाणी समोरील बटन दाबून, रोहिणीताईंनाच विजयी करावे, असे आवाहन माणिकराव  पाटील यांनी केले.       

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या भाजप, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती संघटना,रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार ऍड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या  जनआशिर्वाद व  प्रचार रॅलीचे काल दि 17रोजी अंतुर्ली – उचंदा  जि. प.गटात खामखेड, पूर्णाड, मेळसांगवे, उचंदे, शेमळदे, पंचाने, मुंढोळदे, धाबे पिंप्री भोजना, लोहरखेडा, कर्की, कोठा, नायगाव, पिंप्री नांदू, बेलसवाडी,बेलखेड, धामनदे, भोकरी, नरवेल, पातोंडी, अंतुर्ली या गावात आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ रोहिणीताईंना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळाला.निवडणूक जस जशी जवळ येते आहे, तस तशी मतदारसंघात रंगत वाढते आहे. श्री पाटील यांनी पुढे सांगितले की,  मुक्ताईनगर मतदारसंघात जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले नाथाभाऊ हीच रोहिणी ताईची भक्कम बाजू आहे. सोबत रोहिणी ताई स्वतः व्यवसायाने वकील असल्याने त्या नागरिकांच्या समस्या विधानसभेत मांडून जनसामान्य जनतेला न्याय देऊ शकतील असा विश्वास त्यांना आहे, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रोहिणीताईंनी भाजपाची प्रचार यंत्रणा सक्षमपणे सांभाळली होती. याच प्रचारादरम्यान त्यांच्यातील नेतृत्वगुणांची पारख झाली होती. यामुळे त्यांची जळगाव जिल्हा सरचिटणीसपदावर नियुक्‍ती झाली. पुढे जिल्हा बँकेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अगदी डबघाईस आलेल्या व ‘ड’वर्गात खितपत पडलेल्या जिल्हा बँकेला त्यांनी दोनच वर्षात ऑडिट ‘अ’ वर्ग मिळवला. मुक्‍ताईनगर मतदारसांतील मतदार आजवर निर्धास्तपणे एकनाथराव खडसे यांना आशिर्वाद देत आले आहे. आता त्यांची सुकन्या निवडणुकीच्या मैदानात आहे. नेतृत्वगुण, सर्वांना सामावून प्रगती करण्याची रोहिणीताईंची वृत्ती असल्याने, भाजपालाच मतदान करण्याची इच्छाशक्‍ती आता मतदारसंघातून दिसून येत आहे. त्यामुळेच या निवडणूकित त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.  लोकनेते आ.  एकनाथराव खडसे ,खा श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात आलेली विकास गंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी सौ रोहिणी ताईंना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना  केले.
यावेळी प्रचार रॅलीत पंचायत  समिती  सभापती सौ शुभांगी ताई भोलाने, जि. प. सदस्य वैशाली तायडे, जि प सदस्य  निलेश पाटील, माजी कृ उ बा समिती सभापती  रमेशभाऊ  पाटील,भगवानभाऊ भोलाने, भागवतभाऊ पाटील, किशोरभाऊ  महाजन,लक्ष्मण भालेराव,युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश  चौधरी, भुसावळ प स सभापती प्रितिताई पाटील, प स सदस्या वंदना ताई उन्हाळे, मनिषताई देशमुख, रोहिणीताई जावळे, वनिताताई नेवे, स्वातीताई मोराळे,सरचिटणीस संदीप देशमुख,रामभाऊ पाटील,दिनकर पाटील, प्रवीण पाटील, सुधाकर महाजन, रामदास चौधरी, ताहेर खान पठाण, विलास पांडे, संजय चौधरी, संजय पाटील, नरेंद्र दुट्टे, सुनिल काटे,चंद्रकांत भोलाने,प्रदीप साळुंखे,कैलास कोळी, नितीन पाटील,कैलास पाटील,सोमनाथ पाटील,  जानकीराम पांडे  , लक्ष्मण चौके, संजय पाटील, गुड्डू पाटील, गोपाळ पाटील,बाळू पाटील, हिरामण भोई, गोटू भोई, संतोष कोळी, सोपान कोळी, नितीन भालेराव, सोपान जवरे, सोपान पाटील, भैय्या पाटील, सुरेश भालेराव, प्रकाश कोळी, दिलीप भोई, इंद्रायणी भोई, सुभाष कोळी, भागवत पाटील,शांताराम गवळे, सुभाष घरघोडे, नामदेव बेलदार, संजय कटोळे, गणेश गवते, राहुल अटकळे,राष्ट्रपाल शिसोदे ,संजय चौधरी, गोविंद महाजन श्रीधर चौधरी, मोहन महाजन,विनायक पाटील, धोंडू पाटील,तुकडू घटे,सुभाष घटे आदी सह  महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे कार्य व विकस कामांवर विश्‍वास ठेवून वढोदा, कुर्‍हा, महालखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंच्या फार्महाऊसमध्ये भाजपात प्रवेश केला. तसेच पिंप्री आकाराऊत व मुक्‍ताईनगर शिवसेनेच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्यानेही भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे मुक्‍ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीला चांगलाच हादरा बसला आहे.भाजपामध्ये प्रवेश करणार्‍यांमध्ये माजी सरपंच माणिकराव पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, कुर्‍हा येथील माजी सभापती डी.ओ.पाटील, हाफिज काजी, सैय्यद हमीदुल्लाह, बाळू करे, शालिग्राम भगत, कैलास पाटील, भास्कर पाटील, अंबादास देवधोंडे, दिनकर पाटील, रहिमखा काझी, महादेवजी पाटील, समाधान कुटे, भावरव पाटील, पुरुषोत्तम पाटील, धनराम पाटील, प्रकाश पाटील तसेच मुक्‍ताईनगर येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते चेतन राजपूत यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी एकनाथराव खडसे यांच्यासोबत बेटी बचाव बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, तालुका सरचिटणीस डॉ.बी.सी. महाजन, वढोदा येथील रामभाऊ खोरखेडे, सीताराम टावरी, कृउबा सभापती निवृत्ती पाटील, कमलकिशोर गोयंका, मनोज तळेले, मुक्‍ताईनगर न.प. नगराध्यक्ष व नगरसेवक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाज भाजपा सोबत – ताहेरखा मियाखा

“मुक्ताईनगर विधानसभेचे भाग्यविधाते आ एकनाथराव खडसे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी शासकीय तंत्रनिकेतन मुक्ताईनगर शहरात आणले असून मुस्लिम समाजातील मुला -मुलींना उच्च शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.त्याचा लाभ निश्चित समाजाच्या उत्थाना साठी होणार आहे. शिवाय मुस्लिम वस्ती असलेल्या गावात  कब्रस्थान, शादीखाने  देऊन नाथाभाऊनी समाजाचा नेहमीच सन्मान केला आहे, याशिवाय मुक्ताईनगर  व बोदवड येथे अल्पसंख्यांक समाजाचेच नगराध्यक्ष बसवले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत संपूर्ण मुस्लिम समाज भाजपा सेना महायुती च्या उमेदवार सौ रोहिणी ताई यांच्याच पाठीशी भक्कम पणे उभा आहे, समाजातील एक  अन एक मत कमळाला मिळेल ” असा विश्वास संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष  ताहेरखा मियाखा यांनी व्यक्त केला.

फुलेल तर कमळच –  रमेश कडू पाटील 

“आ.एकनाथराव खडसे यांनी जातीपातीचे राजकारण न करता  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी  विराजमान करून  माझ्या रूपाने गुजर समाजाला सन्मान दिला. गेल्या तीस वर्षात भाऊंनी  फक्त्त माणसं जोडली,कार्यकर्त्यांना  मोठे  केले. माझ्या प्रमाणेच अशोकभाऊ  कांडेलकर  यांनाही सलग पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी देऊन कोळी समाजाचा गौरव केला.रावेर आणि अंतुर्ली भागातील केळी पीक विम्याच्या निकषात शासन दरबारी अंशतः बदल करून केळी उत्पादकांना फार मोठा दिलासा दिला आहे.  फार पूर्वीपासून ची मागणी असलेल्या पिंप्री नांदू -निंभोरा सिम पूल निर्मिती करून खऱ्या अर्थाने दोन्ही तालूक्यातील नागरिकांचा खर्च नि वेळेची बचत केली.  म्हणूनच येत्या 24तारखेला सौ रोहिणीताईच विजयी होऊन मतदार संघात कमळ फुलेल ” अशी खात्री माजी कृ.  उ . बा. समिती सभापती  रमेशभाऊ पाटील यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना एस.टी. वर्कर्स (इंटक) संघटनेचा जाहीर पाठिंबा

Next Post

गुरव महासंघ जळगावतर्फे महायुतीचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना पाठींबा

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
गुरव महासंघ जळगावतर्फे महायुतीचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना पाठींबा

गुरव महासंघ जळगावतर्फे महायुतीचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना पाठींबा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us