Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकासात्मक कामे लवकर पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या- खा. रक्षाताई खडसे यांचे निर्देश

najarkaid by najarkaid
October 5, 2020
in जळगाव
0
विकासात्मक कामे लवकर पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या- खा. रक्षाताई खडसे यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (जिमाका) दि. 5 – यंत्रणांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नागरीकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते तर खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील यांचेसह विविध पंचायत समित्यांचे सभापती व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीमती खडसे म्हणाल्या की, कोरोनामुळे मागील काळात लॉकडाऊनमुळे विविध विकास कामे करता आली नाही. परंतु आता कामांना गती देऊन शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत व या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गती वाढवा. जिल्ह्यातील ज्या नगरपालिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी प्राप्त झाला नसेल त्याची माहिती द्यावी, हागणदारीमुक्त गावांमध्ये नागरीक उघडयावर शौचास जातात हे योग्य नसून स्वच्छ भारत योजनेत वैयक्तिक शौचालयांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतरस्त्यांची कामे करावीत. कोरोनामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच खाजगी रुग्णालये रुग्णांकडून चुकीची बिलांची आकारणी करीत आहे. कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्वसामान्य नागरीकांची लुट होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा साठा मुबलक राहील याचीही यंत्रणेने दक्षता घ्यावी, त्याचप्रमाणे कोरोना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे, कोविड उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.
योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होता कामा नये – खासदार उन्मेष पाटील
सर्वसामान्य नागरीकांसाठी शासन विविध लोकोपयोगी योजना राबवित असते. या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जे अधिकारी योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतील. त्यांचेवर कारवाई करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली. तसेच अमृत योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, शिवाजी नगर पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरीकांना रेल्वेच्या ओव्हरब्रीजवरुन ये-जा करण्यास परवानगी मिळण्याची सुचनाही त्यांनी केली.
यावेळी जिप अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भाळे, चिमणराव पाटील, लताताई सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष यांनीही विविध सुचना मांडल्यात.
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेत जिल्ह्यातील पंधरापैकी दहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित तालुक्यांचा समावेश करण्यासाठी प्रशासनातर्फे शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीत प्रधानमंत्री पिक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, रोजगार हमी योजना अमृत योजनांसह दूरसंचार, रेल्वे, खणीकर्म या मुलभूत सुविधा आदिंचाही आढावा घेण्यात आला.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

Next Post

रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार होऊ नये यासाठी अन्न औषध विभागाने उचलले कडक पावलं…

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार होऊ नये यासाठी अन्न औषध विभागाने उचलले कडक पावलं…

रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार होऊ नये यासाठी अन्न औषध विभागाने उचलले कडक पावलं...

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us