जळगांव :- सावदा येथील गवतबाजार परिसरातील वामन रावजी वाघुळदे ( वय 87 ) यांचे आज सकाळी दि.14 रविवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते शेतकरी व व्यावसायिक यशवंत वाघुळदे यांचे वडील होत. वामन वाघुळदे यांना सामाजिक व आध्यामिक कार्यात विशेष रुची होती.त्यांच्या पश्चात दोन मुली , एक मुलगा आणि नातवंडे असा खूप मोठा परिवार आहे.















