नवी दिल्ली, – वस्त्रोद्योग मंत्रालय वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता या क्षेत्रातील संबंधित दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. आधी वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये पीएलआय योजनेसाठी ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी, 2022 देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून ती 14 फेब्रुवारी, 2022 करण्यात आली होती. आता ही मुदत 28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या योजनेसाठी पात्र असणारे अर्जदार फक्त ऑनलाइन माध्यमातून अर्ज दाखल करू शकणार आहेत. यासाठी संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.
https://pli.texmin.gov.in/mainapp/Default
या योजनेसाठी अर्ज कसा करावा, यासाठी आवश्यक माहिती, सूचना जाणून घेण्यासाठी संबंधितांना पुढील लिंकचा वापर करता येईल.















