Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्षा गायकवाड काकोडकरांपेक्षा बुद्धिमान आहेत का?’

najarkaid live by najarkaid live
February 27, 2020
in जळगाव
0
वर्षा गायकवाड काकोडकरांपेक्षा बुद्धिमान आहेत का?’
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे –  राज्य सरकारने सर्व बोर्डांसाठी दहावी इयत्तेपर्यंत मराठी विषय अनिवार्य केला आहे तसेच एमआयईबी अभ्यासक्रमही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मराठी भाषेचा फायदा काय झालाय? उलट, मराठी माध्यमातील मुले एमआयईबीच्या माध्यमातून आयबी अभ्यासक्रम शिकू शकली असती, हे नाकारून सरकारने त्यांच्यावर अन्यायच केला आहे, अशी टीका माजी शिक्षण मंत्री व भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर विनोद तावडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा अभ्यासक्रम डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचुक यासारख्या प्रयोगशील शिक्षणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम तयार झाला आहे. असे असताना यावर शिक्षणमंत्र्यांचा काय आक्षेप आहे, हे अनाकलनीय आहे, असे नमूद करताना वर्षा गायकवाड यांना स्वत:ची बुद्धिमत्ता डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर यांच्यापेक्षा अधिक आहे असे वाटते का?, असा खरमरीत प्रश्नच तावडे यांनी उपस्थित केला आहे.

एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करायचा झाल्यास तो नॅशनल कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅ्न्ड ट्रेनिंगच्या (NCERT) मार्गदर्शक सूत्रानुसारच करावा लागतो. पण सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण व्यवस्थेला स्वायत्तपणे अभ्यासक्रम बनविता येतो. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी सर्वार्थाने परिपक्व घडू शकतो. ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थी हा या अभ्यासक्रमातून शिकला तर डॉक्टर, इंजीनिअर, शास्त्रज्ञ, आर्किटेक्चर, सनदी अधिकारी होण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. पण दुर्देवाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थी हा अशा कुठल्याही गोष्टीपर्यंत पोहचू नये आणि पोहचायचेच असेल तर इंग्रजी माध्यमातूनच पोहचले पाहिजे, असा अट्टाहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि श्रीमती वर्षा गायकवाड यांचा कां आहे हे न समजण्यासारखे आहे, अशी टीकाही तावडे यांनी केली.

एमआयईबी अभ्यासक्रमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मराठीतून शिकण्याची संधी मिळाली होती. मात्र, सरकारने हा अभ्यासक्रमच बंद करून शिक्षणाबद्दल त्यांचे विचार किती प्रतिगामी आहेत, हेच दाखवून दिले आहे, असा आरोपही तावडे यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठी दिनी राज ठाकरेंनी पोस्ट केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ

Next Post

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे 29 रोजी कुस्त्यांची दंगल !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे 29 रोजी कुस्त्यांची दंगल !

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे 29 रोजी कुस्त्यांची दंगल !

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us