- वरणगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून मोफत धान्य वितरणाचा घेतला आढावा
- बऱ्याच नागरिकांचे नावे दुसऱ्या दुकानाशी जोडल्याने संताप
- ज्यांना धान्य मिळत नाही अशा नागरिकांची यादी करून अन्न पुरवठा नागरी मंत्री ना.छगन भुजबळ यांना देणार
वरणगाव, (अंकुश गायकवाड) – कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न सुरक्षा योजनेतून नागरिकांना 5 किलो प्रति वेक्ती मोफत तांदूळ वितरण वरणगावला आजपासून सुरवात झाली.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून पारदर्शकपणे धान्य तांदूळ वितरण होते किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखली आज 21 रोजी सकाळी 10 वाजेपासून वरणगाव शहरातील स्वतः धान्य दुकानावर जाऊन आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, युवक शहराध्यक्ष प्रशांत मोरे, पवन मराठे, सुमित चौधरी, गजानन वंजारी, राजेश चौधरी, पप्पू जकातदार यांनी दुकानावर जाऊन मोफत वितरण होणाऱ्या तांदूळ नागरिकांना मिळतो आहे किंवा नाही याची चौकशी करून आढावा घेतला.
बऱ्याच नागरिकांची नावे दुसऱ्या दुकानदाराकडे वर्ग झालाल्याने संताप होत आहे.
गावातील बऱ्याच नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाच्या पुस्तकांवर वितरणाचा शिक्का नसल्याने ओरड आहे. अशा नागरिकांची यादी तयार करून राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करून त्यांचे धान्य सुरु करण्याचे आश्वाशन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी नागरिकांना दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.