Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वडिलांच्या संपत्तीवर मुला-मुलींचा हक्क किती? काय म्हणतो कायदा? हे लगेचच जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
September 13, 2022
in राष्ट्रीय
0
पत्नीच्या खून केल्याप्रकरणी पतीस जन्मपेठेची शिक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहचतात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना वडील हयात असोत किंवा नसो, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.

आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्कासंबंधीच्या तरतुदींबद्दल अनेक लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. विशेषत: महिलांना याची जाणीव कमी असते. या मालमत्तेशी त्यांचा काहीही संबंध नाही असे अनेक महिला गृहीत धरतात. याशिवाय सर्व सामाजिक परंपरांमुळे मुलींना वडिलांच्या मालमत्तेतील हक्कापासून वंचित ठेवले जाते. येथे आम्ही तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीवर मुला-मुलींचा हक्क किती? याबाबत सांगणार आहोत.

मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क:- पूर्वी समाजामध्ये वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो. हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे 2005 आधी कायदा तसा होता. 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली, त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असे सांगण्यात आले.

हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला हा कायदा
लागू:- या कायद्याचे नियम फक्त हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या समाजालाच लागू होतील असे या कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे.

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?:-

कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीचा हक्क:-

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीचा समान वाटा असतो. जसे कि जर कुटुंबामध्ये तीन मुलं असतील तर तिन्ही मुलांना आपल्या वारसाहक्काप्रमाणे एक तृतियांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल.

मुस्लीम समाजामध्ये वाटणी कशी होते?:- मुस्लीम समाजामध्ये हिंदू समाजापेक्षा वाटणीची पद्धत जरा वेगळी आहे जसे कि जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही.

वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम पुढीलप्रमाणे:- जर आपल्याला आपली वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर त्याचे नियम खूप कडक आहेत, कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात. त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात.

स्वतःच्या मर्जीने संपत्ती विकू शकत नाही:- जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी जर झाली नसेल तर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ती स्वत:च्या मर्जीने विकू शकत नाही.

हे पण वाचा..

पेट्रोल-डिझेल, LPG सिलिंडरच्या किमतीतून मिळणार दिलासा ; जाणून घ्या सरकारचे संपूर्ण प्लॅनिंग

खळबळजनक ! अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग चार वर्षे तरुणीवर केला बलात्कार

प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत दरमहा मिळेल ‘इतके’ पेन्शन

शेतकऱ्यांना महागड्या डिझेलपासून मिळेल मुक्ती, फुकटात सिंचन करून उत्पन्न वाढेल

कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणे गरजेचे:- जर वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणं आवश्यक आहे. जर संपत्ती विकण्यास सहमती नसेल तर ती संपत्ती आपण विकू शकत नाही.

दुसऱ्या पत्नीचा वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार
असतो का?:- हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते. जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं. अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्या व्यक्तीला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो.

कमावलेल्या संपत्तीवर कुणाचा हक्क असतो?:- जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजेच ती तुम्हीच मेहनतीने कमावलेली असेल तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची, याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे. तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता.

जर मृत्युपत्र नसेल तर कायदा काय सांगतो?:– यामध्ये वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगळता, जी तुम्ही कमवलेली संपत्ती आहे, त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. जर त्या व्यक्तीचे आई-वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजिविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर..आज इतक्या रुपयाची झाली घसरण

Next Post

सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा

सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us