वडजी (प्रतिनिधी) : कोरोना विषाणु संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भडगांव शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा पादुर्भाव होऊ नये.या बाबतीत तहसीलदार माधुरी आंधले व नगरसेविका योजना पाटील यांनी वडजी कॉरनटाईन सेंटर येथे भेट दिली व मार्गदर्शन केले.आपल्या आरोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेले अर्सेनिक् ऐल्बम 30 या औषधी गोळ्या व पौस्टिक आहार यशस्विनी सामजिक जनजागृती अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील यांनी वाटप केले.
तसेच कोरोना प्रतिबंध ड्यूटीवरील महसुल,नगर,आरोग्य,शिक्षण विभागअधिकारी, कर्मचारी,कॉरनटाईन,सर्व सहकारी, यांना मास्कसह फिजिकल डिस्टेंट ठेउन मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे करीत आहेत.यशस्वी लढा कोरोनाशी घरात रहा सुरक्षित रहा आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करा. भडगांव शहर आत्मविश्वासाने कोरोनामुक्त करुया व ग्रामीण भागाकड़ेही लक्ष्य देऊया असा संकल्प करण्याचे आवाहनही तहसीलदार माधुरी आंधले व नगरसेविका योजना पाटील यांनी केले.