Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी चा “गेम”

najarkaid by najarkaid
May 24, 2019
in जळगाव
0
वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी चा “गेम”
ADVERTISEMENT

Spread the love

काँग्रेस- राष्ट्रवादीला मोजावी लागली मोठी किंमत
जळगांव  :  लोकसभा निवडणुकी करिता वंचित बहुजन आघाडीला 12 जागा देऊ करणाऱ्या  काँग्रेस – राष्ट्रवादीचा वंचित बहुजन आघाडीमुळे  8 लोकसभा  मतदार संघात गेम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे दोन माजी मुख्यमंत्री, राजू शेट्टी यांच्यासारखा मातब्बर शेतकरी नेता, धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेचे केलेले बजरंग सोनावणे, परभणीच्या रूपाने राष्ट्रवादीच्या आशा खिळून असलेले राजेश विटेकर, बुलढाण्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील या मातब्बरांचा वंचित बहुजन आघाडीमुळे पुरता गेम झाल्याचे आकडेवारी सांगते.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रताप चिखलीकर ४ लाख ७५ हजार ८०१ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ४ लाख ३३ हजार ५०२, मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी १ लाख ६२ हजार ६१२ मते घेतली. काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांची बेरीज केली असता ५ लाख ९६ हजार ११४ एवढी होते. त्यामुळे येथे चव्हाण यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसला.
सोलापूर मतदारसंघातून भाजपचे जयसिध्देश्वर स्वामी ५ लाख २४ हजार ९८४ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ३ लाख ६६ हजार ३७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७० हजार ७ मते मिळाली. काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली असता ५ लाख ३६ हजार ३८४ एवढी मते होतात. येथेही वंचितच्या उमेदवारामुळे शिंदेना फटका बसला.
अकोला मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे ४ लाख १५ हजार ७४० मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ४७ हजार २१ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७३ हजार ११२ मते मिळाली. काँग्रेस आणि वंचितची एकत्र बेरीज केली तर ५ लाख २० हजार १३३ मते होतात. यामुळे येथेही वंचितचा फटका काँग्रेसला बसला.
बीड मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे या ६ लाख ७८ हजार १७५ मते घेऊन विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९० हजार ८०७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना ९२ हजार १३९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितच्या मतांची एकत्र बेरीज केली तर ही मते ६ लाख ८२ हजार ९४६ हजार होते. त्यामुळे येथेही वंचितच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीला फटका बसला.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांना ४ लाख ८६ हजार ३०९ मते घेऊन विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना ४ लाख ३६ हजार ५६७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अस्लम यांना १ लाख १६ हजार ४५० मते मिळाली. स्वाभिमानी आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या मतांची एकत्र बेरीज केली तर ५ लाख ५२ हजार ५०७ एवढी होते. त्यामुळे शेट्टी यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसला.
बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव ४ लाख ६४ हजार ६१८ मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ४६ हजार ९७४ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना १ लाख ५७ हजार १३९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित च्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली तर ५ लाख ४ हजार ११३ मते मिळाली. यामुळे बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला.
परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव यांना ५ लाख २९ हजार १४८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ४ लाख ९१ हजार २ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना १ लाख ४७ हजार ८४९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित उमेदवाराची एकत्र बेरीज केली असता ती ६ लाख ३८ हजार ८५१ एवढी मते होतात. त्यामुळे विटेकर यांना वंचितच्या उमेदवारामुळे फटका बसला आहे.
सांगली मतदारसंघात भाजपचे संजय पाटील ४ लाख ९७ हजार ५७३ मते घेऊन विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना ३ लाख ३८ हजार ११६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी २ लाख ९३ हजार ९३ मते घेतली. स्वाभिमानी आणि वंचितच्या मतांची बेरीच केली असता ती ६ लाख ३१ हजार २०९ एवढी होते. त्यामुळे वंचितच्या उमेदवाराचा फटका या मतदारसंघातही बसला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून  रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन 

Next Post

इंडियन  रेडक्रॉस सोसायटी संधर्भात गॅझेट संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
इंडियन  रेडक्रॉस सोसायटी संधर्भात गॅझेट संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी

इंडियन  रेडक्रॉस सोसायटी संधर्भात गॅझेट संचिकेची माहिती देण्यास विधी व न्याय  विभागाची टोलवाटोलवी

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us