चाळीसगाव( किशोर शेवरे) सर्व सामान्य जनतेला दैनंदिन काळात येणाऱ्या अनेक समस्या असतात मात्र त्यांना शासन व प्रशासना मार्फत न्याय मिळत नाही.म्हणून वंचित घटकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य रयत सेनेच्या माध्यमातून गेल्या १० ते १२ वर्षांपासून आम्ही सातत्याने करीत आहोत असे प्रतिपादन तमगव्हाण येथे दि ८ रोजी रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी रयत सेना संस्थापक गणेशभाऊ पवार यांनी केले.
तालुक्यातील तमगव्हाण येथे दि ८ रोजी रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन रयत सेना संस्थापक गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ) याची लाभली . रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी गणेश पवार म्हणाले की सामाजिक कार्यातून आज पर्यंत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुंटुंबाला मदत ,गरीब असलेल्या बालकांना वैद्यकीय उपचारासाठी वडीलांची हालाखीची परीस्थिती असल्यामुळे रुग्णालयाचे बिल भरण्यास आर्थिक मदत ,महिला आरोग्य शिबिरे ,कला व क्रीडा साहित्य व विद्यार्थ्यांचा गौरव,गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,रस्ते अपघातग्रस्ताना घटनास्थळी जाऊन संकट काळात सहकार्य,गरजू विद्यार्थ्यांना शालेय फी साठी आर्थिक मदत,आरोग्य शिबिरातुन मोफत आरोग्य तपासणी व दुर्धर आजाराची तपासण्या करण्याकरिता आर्थिक मदत,कोरोना काळात गोरगरीबाना धान्य वाटप , मोफत सॅनेटायजर्स व मास्क वाटप,कोरोना काळात रक्ताचा तुटवड्यामुळे रक्तदान असे विविध जनकल्याणकारी कार्य रयत सेना समाजाचे काही देणे लागतो म्हणून करीत आहे . यापुढेही समाजाच्या विविध समस्या व प्रश्नांसाठी रयत सेना लढत राहणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंदावर तुर खरेदी करताना डावलले जाऊन व्यापाऱ्यांना झुकते माप दिले जात असल्याचे निर्देशनास येताच शेतकऱ्यांची तुर खरेदीला प्राधान्य देण्यासाठी आंदोलन करून शेतकऱ्यांची तुर खरेदी करण्यास प्रशासनाला भाग पाडुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.तसेच चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांना कांदा खरेदी करताना कमी भाव देत असल्याचे लक्षात येताच नागद रोड वरील उपबाजारासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सेनेने रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव मिळवून दिल्याचे सांगितले .प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ) याप्रसंगी बोलताना म्हणाले की रयत सेना सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारी संघटना आहे.ग्रामीण भागात अनेक समस्या असून त्या तडीस नेण्यासाठी रयत सेना काम करेल शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी,महिलांच्या न्यायाकरीता संघटना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहुन समाजहित जोपासत असते.सामाजिक चळवळीतुन जनहिताला प्राधान्य देवून रयत सेनेच्या माध्यमातून कार्य सुरू राहणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,जिल्हाअध्यक्ष संजय कापसे ,शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे,
उपस्थित होते,
तमगव्हाण रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी तुषार पाटील,उपाध्यक्ष शशिकांत शिंदे ,कार्याध्यक्ष सागर पाटील, संघटक शुभम पाटील,सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, सहकार्याध्यक्ष वैभव मोरे, सहसचिव धनंजय अहिरे, कोषाध्यक्ष प्रशांत पाटील ,प्रसिद्धी प्रमुख हेमंत जाधव ,समन्वयक अक्षय सोनवणे
यांची निवड रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी जाहीर केली.कार्यक्रमास रत्नाकर पाटील, खुशाल देसले,भावलाल पाटील,दत्तात्रय पाटील,अनिल कापसे ,किशोर शेळके यांच्यासह विकास पाटील, मनीष पाटील, गौरव पाटील ,
उद्देश शिंदे ,नवनाथ राठोड, बाबाजी पावले, केतन निकुंभ, सतीश निकुंभ, लाला पठाण ,पापा पठाण ,आबा पारधी, ज्ञानेश्वर राठोड,गोरख नाईक ,अजय नाईक, भाऊ कापसे ,तातूराम सूर्यवंशी, भगवान मोहीम, मंगेश हांडे, युवराज पांचाळ, सागर पाटील ,अनिल पाटील, सुभाष कापसे ,नाना शेलार, कल्पेश पाटील अदि रयत सेना कार्यकर्ते उपस्थित होते