Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचिंतांच्या भुकेला मिळाला ‘शिवभोजना’चा आधार !

najarkaid by najarkaid
June 3, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

लॉकडाउनच्या काळात नाशिक विभागात १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्यांचे वितरण;

 नाशिक –लॉकडाउनच्या काळात कोणतीही व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त अर्जून चिखले यांच्या नियंत्रणाखाली नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यात ३१ मे २०२० पर्यंत ११९ शिवभोजन केंद्रांमधून १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरीत मजूरांची पार्श्वभूमी लक्षात घेता विभागातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पाचपट अधिक थाळ्यांचा इष्टांक वाढवून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुकास्तरावर देखील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नाशिक विभागात १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्हास्तरावर ११ शिवभोजन केंद्रांमार्फत ३ हजार २०० थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावरील ३० शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ३ हजार २०० थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावरील एकूण ४१ केंद्रांच्या माध्यमातून ६ हजार ४०० थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हास्तरावरील १० शिवभोजन केंद्रांमार्फत ६९९ तर तालुकास्तरावरील २२ शिवभोजन केंद्रांमार्फत २ हजार १७० थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात ३२ शिवभोजन केंद्रांमधून २ हजार ८६९ शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २२ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात १० जिल्हास्तरीय शिवभोजन केंद्रांमधून १ हजार ४०० तर तालुकास्तरीय ९ शिवभोजन केंद्रांमधून १ हजार १२५ थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील १९ केंद्रांमधून २ हजार ५२५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

धुळे जिल्हयातील जिल्हास्तरीय ६ शिवभोजन केंद्रांमधून ७२५ व ९ तालुकास्तरीय शिवभोजन केंद्रांमधून ६७५ थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण १५ शिवभोजन केंद्रांमधून  १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.

नंदुरबार जिल्हास्तरावरील ३ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून ५०० तर तालुकास्तरावरील ९ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ९०० थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १२  शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

नाशिक विभागातील तालुकास्तरावरील एकूण ७९ शिवभोजन केंद्रांमार्फत ८ हजार ७० शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावरील एकूण ४० शिवभोजन केंद्रांमार्फत  ६ हजार ५२४ थाळ्यांचे वाटप झाले आहे. त्यानुसार विभागातील ११९ शिवभोजन केंद्रांमार्फत १४ हजार ५९४ थाळ्यांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे.

लक्षणीय :

◼ नाशिक विभागात ३१ मे २०२० पर्यंत ११९ शिवभोजन केंद्रांमधून १४ हजार ५९४  थाळ्यांचे वितरण

◼ नाशिक जिल्ह्यात ४१ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ६ हजार ४०० थाळ्यांचे वितरण.

◼ जळगाव जिल्ह्यात ३२ शिवभोजन केंद्रांमधून २ हजार ८६९ शिवभोजन थाळ्यांचे वितरण पूर्ण.

◼ अहमदनगर जिल्ह्यातील १९ केंद्रांमधून २ हजार ५२५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण.

◼ धुळे जिल्ह्यात एकूण १५ शिवभोजन केंद्रांमधून  १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण.

◼ नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १२ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून १ हजार ४०० शिवभोजन थाळ्यांचे

     वितरण पूर्ण.

◼ नाशिक विभागात तालुकास्तरावरील एकूण ७९ शिवभोजन केंद्रांमार्फत ८ हजार ७० शिवभोजन

     थाळ्यांचे वितरण.

◼ नाशिक विभागात जिल्हास्तरावरील एकूण ४० शिवभोजन केंद्रांमार्फत ६ हजार ५२४ शिवभोजन

    थाळ्यांचे वितरण.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’

Next Post

जिल्ह्यात आणखी 36 कोरोना बाधित रुग्ण आढळले

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी 36 कोरोना बाधित रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us