जळगाव, (प्रतिनिधी)- लॉकडाऊन पाळणार,घरातच राहणार “व्हाट्सअप डीपी” च्या माध्यमातून जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांच्या संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकावासियांना आपल्या आपल्या तालुक्याचा व्हाट्सअप डीपी डिझाईन केला असून या माध्यमातून लॉकडाऊन पाळण्याबाबत मोठी जनजागृती होतांना दिसत आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढल्या नंतर नागरिकांनी लॉकडाऊनचे कडक पालन करावे असा सुर सर्वत्र निघत असतांना अनेक तालुक्यानी स्वयंस्फूर्तीने जनता कफ्रु लागू करून घेतला आहे. तर जिल्हा माहिती कार्यालय देखील मागे न राहता लॉकडाऊन पाळणार, घरातच राहणार असा संदेश असणारा व्हाट्सअप डीपी डिझाईन करून लॉकडाऊन पाळण्यासाठी जनजागृती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने एक चांगले पाऊल उचलले आहे.
या पूर्वीही “मी मास्क वापरणार” वर जनजागृती
कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून “मास्क वापरा, कोरोना टाळा”, “मी मास्क वापरणार”, जनता कफ्रयुत सहभागी व्हा याबाबतच्या पोस्ट तयार करून जिल्हा माहिती कार्यालयाने सोशल मीडियावर जनजागृती केली होती.
लॉकडाऊन झाल्या पासून प्रशासनाच्या विविध निर्णयाची व प्रसार माध्यमांना देण्यात येणारी माहिती अचूकपणे माध्यमांना देण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके हे करत असून जनजागृती करिता विविध उपक्रम हाती घेत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.