भुसावळ : एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे अटकेतील लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गणेश गव्हाणे (रा. जामनेर) हा तालुका पोलीस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्याने एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोड म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली होती.
यामुळे सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीचे उप अधिक्षक शशिकांत पाटील यांनी पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पथकाची निर्मिती केली.जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
















