पाचोरा : डॉक्टर हे खऱ्या अर्थाने देवदूत. आपलं शरीराचं दुखणं मनाचं दुखणं हमखास बरं करणारे तज्ञ. पण आपल्या सर्वसामान्यांच्यादृष्टीने ‘डॉक्टर’ या शब्दाची व्याख्या फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? डॉक्टर म्हणजे दिलासा मनाला उभारी जीवनाची नवी उमेद, असह्य वेदनेतून हमखास सुटका; थोडक्यात, आरोग्याची वाट सुलभ करणारा एक अवलिया. जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त १ जुलै हा दिवस संपूर्ण जगभरात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो..
यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावने सुद्धा डॉक्टर सुद्धा डे निमित्त पाचोरा भडगाव तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान करण्याचे आयोजन १ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता पाचोरा येथील स्वप्नशिल्प हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भूषण मगर व सेक्रेटरी डॉ.बाळकृष्ण पाटील यांनी केले होते. या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवर डॉक्टर्स यांना वृक्ष रोप देऊन सन्मानित करण्यासाठी रोटरी क्लबच्या व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होत.े यावेळी दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकूंद बिल्दीकर, नगरसेवक विकास पाटील, दादाभाऊ चौधरी, डॉ.सागर गरुड, डॉ.भरत पाटील, अध्यक्ष डॉ.भूषणदादा मगर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी अध्यक्ष राजेश मोर,चंद्रकांत लोढाया, सचिव-रो.डॉ.बाळकृष्ण पाटील, अध्यक्ष- रोहन पाटील, उपाध्यक्ष- रितेश ललवानी, सहसचिव- प्रा. शिवाजी शिंदे, कोषाध्यक्ष- रो. डॉ. अमोल जाधव, क्लब ट्रेनर राजेश मोर व रुपेश शिंदे सार्जंट ॲट आर्म. डॉ. विशाल पाटील, डॉ प्रदिप पाटील, रणजित पाटील, विकास पाटील, ॲड. योगेश पाटील, मुनोत जैन, अनिल वाघ, राजू पाटील, डॉ.अमोल जाधव, डॉ.प्रमोद पाटील, डा.ॅप्रवीण माळी, डॉ.रुपेश पाटील, डॉ.गोरख महाजन, डॉ.शरद वाणी, डॉ.प्रतीक पाटील, डॉ.जीवन पाटील, डॉ.तोसीफ खान, डॉ.विशाल पाटील, डॉ. बच्छाव, डॉ.अमोल जैन, डॉ.आलम देशभुख, डॉ.पवण राजपुत, डॉ.सचिन पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, सीए अंकीता अग्रवाल, अमोल जैन, संचालन प्रा.सी.एन. चौधरी, शिवाजी शिंदे यांनी केले. यावेळी सर्व पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
–