बोदवड, (प्रतिनिधी) – अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माज़ी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवसा निमित्त युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांच्याकडून जलचक्र बुद्रुक व जलचक्र खुर्द येथे स्वखर्चाने मदत करित साधारणत: महिनाभर पुरेल ईतके गरजु कुटुंबातील महिलांना 5 किलो आटा, 1 किलो साखर, 1 लिटर तेल, 2 किलो तांदूळ व इतर किराणा साहित्य गरीब लोकांना आले.
प्रा. हितेश पाटील यांनी गरजु कूटुंबाना पुढील सहा महिन्यासाठी 7500 रुपये तसेच मनरेगा अंतर्गत 200 रुपये दिवसाचा रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणी मध्यम उद्योगतील रोजगार वाचविन्यासाठी थेट खात्यात आर्थिक मदत करुण केंद्र सरकारने न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी जिल्हाअध्यक्ष युवक काँग्रेस प्रा. हितेश सुभाषराव पाटील, धनराज पाटील, रवी पाटील, गणेश पाटील, बंटी पाटील, तालुकाध्यक्ष पुंजाजी पाटील, संदीप पाटील, रंगनाथ गावंडे, विजय सपकाळ, संभाजी साठे, किरण माळी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.