रावेर (शिवा कोळी) – येथील माध्यमिक शिक्षक सोसायटी सभागृहात येणाऱ्या काळात होणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटी, ग.स.सोसायटी व इतर सोसायटींमधील निवडणूकीसंदर्भात शिक्षकसेना पुरस्कृत महाविकास गटाची आढावा बैठक दि.८ रोजीसंपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयीन कर्मचारी शिक्षकसेनेचे राज्याध्यक्ष अतुल शेटे होते.जिल्हाध्यक्ष – ईश्वर सपकाळे यांनी रावेर तालूका माध्यमिक शिक्षक सेना नुतन कार्यकारणीचा सत्कार केला.जिल्हा प्रसिध्दीप्रमुख – संदीप पवार यांनी विदयमान गटांकडून सभासदांचा अपेक्षाभंग व भ्रमनिरास झाला असल्याने महाविकास गटाला प्रत्येक तालूक्यात सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मत आपल्या मनोगतात व्यकत केले. उपाध्यक्ष – नाना पाटील यांनी सभासदांच्या जनभावनेतून गटाची निर्मिती झाली असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी इच्छूक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली.
याप्रसंगी रावेर माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक – नवल चौधरी, माध्यमिक शिक्षकसेना कार्याध्यक्ष – गोविंदा पाटील, बोदवड माध्यमिक तालूकाध्यक्ष – संदीप तायडे, संघटक – प्रदीप हिरोळे, रावेर माध्यमिक तालूकाध्यक्ष – मुबारक उखर्डू तडवी, उपाध्यक्ष – शशिकांत पाटील, कृष्णा घंघरे, कार्याध्यक्ष – संदीप लाड, सरचिटणीस – गोकूळ भोई, कोषाध्यक्ष – सुधीर सैतवाल,विशाल राठोड, प्रशांत पाटील, प्रदीप पाटील,मनिष नाईक, अरुण कोळी,अशोक पाटील, जितेंद्र चौधरी, अजीत तडवी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.